आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धा:येत्या 8 जानेवारीपासून औरंगाबादमध्ये महसुलची विभागीय क्रीडा स्पर्धा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या ८ ते १० जानेवारी दरम्यान महसुलच्या विभागीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकुण ८२ क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील जवळपास दोन हजार अधिकारी कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्तापासून ते कोतवाल पर्यत सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामध्ये ४५० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये क्रिकेट, टेबल टेनिस,फुटबॉल,कबब्डी, कँरम बुद्धीबळ यासह सर्व खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...