आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएप्रिल २०२० मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली नव्हती. त्यामुळे १७ लाख नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न प्रशासनासमोर तितक्या गांभीर्याने जाऊ शकले नव्हते. नगरसेवकांकडे अजूनही तक्रारींचा ओघ वाढत आहे, मात्र अधिकारी दाद देत नसल्याची त्यांची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने २ डिसेंबर रोजी अभिरूप सर्वसाधारण सभा आयोजित करून सर्वपक्षीय नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांत सुसंवाद घडवून आणला.
महाराष्ट्राच्या पत्रकारितेत प्रथमच असा प्रयोग झाला. महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सचिव अपर्णा थेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तब्बल ५ तास चाललेल्या सभेत नगरसेवकांनी समस्या मांडल्या, आयुक्तांनी १६ समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. १९३ कोटींच्या जुन्या पाणी योजनेचे वर्षभरात नूतनीकरण केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहर विकासाचा अजेंडा
सविस्तर वृत्त वाचा.... खालील लिंक वर
अभिरूप महासभा:नगरसेवकांनी पाच तास डागल्या पाणी, रस्ते, अतिक्रमण, कचरा प्रश्नांच्या फैरी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.