आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एज्युकेशन फेअर:दिव्य मराठी एज्युकेशन फेअर शुक्रवारपासून प्रोझोनमध्ये

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला दैनिक दिव्य मराठीच्या वतीने औरंगाबादेत ‘एज्युकेशन फेअर २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. २४, २५ आणि २६ जून असे तीन दिवस प्रोझोन मॉल येथे हे प्रदर्शन भरवले जाईल.

ज्ञानसागर कोचिंग क्लासेस व खडके बायोलॉजी क्लासेस हे या लक्षवेधी प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. व्हेन्यू पार्टनर प्रोझोन मॉल आहे. या फेअरमध्ये नामांकित शाळा - कॉलेजेस, व्यावसायिक शिक्षण इन्स्टिट्यूट्स, पहिलीपासून ते जेईई-मेन्स, अॅडव्हान्स आणि नीटची तयारी करवून घेणारे क्लासेस, आयएएस, ई-कोर्सच्या तयारीसाठीचे स्पेशल कोचिंग क्लासेस, विविध शिक्षण संस्था आणि शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँकांचा सहभाग असेल. ज्या शैक्षणिक संस्थांना या उत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ‘दिव्य मराठी’चे गौरव लाडसावंगीकर (मोबाइल ८८८८८३६६३९) व नाविद खान (८६९८४४८४४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...