आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेअर प्रोझोन:दिव्य मराठी एज्युकेशन फेअर प्रोझोनमध्ये 24 ते 26 जूनला ; शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका यांचा सहभाग

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला दैनिक दिव्य मराठीच्या वतीने औरंगाबादेत ‘एज्युकेशन फेअर २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. २४, २५ आणि २६ जून असे तीन दिवस प्रोझोन मॉल येथे हे प्रदर्शन भरवले जाईल. या बहुपयोगी एज्युकेशन फेअरमध्ये विविध नामांकित शाळा - कॉलेजेस, व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या इन्स्टिट्यूट्स, पहिलीपासून ते जेईई-मेन्स, अॅडव्हान्स आणि नीटची तयारी करवून घेणारे क्लासेस, आयएएस, ई-कोर्सच्या तयारीसाठीचे स्पेशल कोचिंग क्लासेस, विविध शिक्षण संस्था आणि शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका यांचा सहभाग असेल. ज्या शैक्षणिक संस्थांना या शिक्षण उत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी ‘दिव्य मराठी’चे गौरव लाडसावंगीकर (मोबाइल ८८८८८३६६३९) व नाविद खान (८६९८४४८४४४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...