आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून तयारी सुरू असताना रोजगार हमी योजनामंत्री संदिपान भुमरे यांनी, आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत, असे सांगत बाळासाहेबांची शिवसेनाच ही जागा लढवणार असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.
पालकमंत्री भुमरे म्हणाले की, मी पालकमंत्री असल्यामुळे जिल्ह्यात तयारी सुरू आहेच. विकासकामांच्या माध्यमातून पक्षाची तयारी सुरू आहे. पक्षाने आदेश दिल्यानंतर मी लढण्यास तयार आहे.
अशी होती २०१९ लोकसभेची स्थिती उमेदवार पक्ष मते टक्केवारी चंद्रकांत खैरे शिवसेना ३,८४,५५० ३२.०९ हर्षवर्धन जाधव अपक्ष २, ८३ ८९८ २३.६८ इम्तियाज जलील एमआयएम ३,८९,४०२ ३२.४७ सुभाष झांबड काँग्रेस ९१७८९ ७.६६
चंद्रकांत खैरे यांना आम्हीच निवडून आणले शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात आपल्याला लढावे लागेल, असे विचारले असता, ‘खैरे काही वाघ आहेत का? त्यांना आम्ही घाबरत नाहीत. त्यांना आम्हीच निवडून आणत होतो. त्यांनी औरंगाबाद काय काम केले म्हणून मतदारांना त्यांना निवडून द्यावे? त्यांचे अस्तित्व शिल्लक राहिले नाही,’ असे भुमरे यांनी सांगितले.
आम्ही जालना मतदारसंघ मागितला तर चालेल का? भाजपने या मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे याबाबत भुमरे यांना विचारले असता ‘औरंगाबादची जागा शिवसेनाच लढवत आली आहे. उद्या आम्ही जालना मतदारसंघ मागितला तर त्यांना चालेल का? त्यामुळे औरंगाबादमध्ये आम्ही आणि भाजपने जालना मतदारसंघात लढावे. ही जागा आम्ही लढवत होतो आणि आताही आम्हीच लढवणार आहोत,’ असे त्यांनी सांगितले.
मराठा मतांचे गणित महत्त्वाचे गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० व हर्षवर्धन जाधव यांना २ लाख ८३ हजार ८९८ मिळाली. त्यामध्ये मराठा समाजाच्या मतांचे प्रमाण मोठे होते. ही मते शिवसेनेचे गणित बिघडवणारी ठरली होती. त्यामुळे इम्तियाज जलील जिंकून आले. ही मते मराठा उमेदवारांच्या माध्यमातून मिळवण्यासाठी शिंदे गटाेचे प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेबांची शिवसेना तसेच भाजपची मदत या माध्यमातून भुमरे यांचे गणित मांडले जात आहे.
भुमरे यांना पैठणच्या बाहेर कोणी ओळखत नाही : खैरे भुमरे यांच्या दावेदारीबाबत चंद्रकांत खैरे यांना विचारले असता ते म्हणाले की, भुमरे यांना पैठणच्या बाहेर कोणी ओळखत नाही. पैठण मतदारसंघ जालन्यामध्ये येतो, औरंगाबादमध्ये नाही. त्यांना पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीत मीच निवडून आणले आहे. त्यांनी पैठणमध्ये काय काम केले? जिल्ह्यात गद्दारांना स्थान नाही. मी शिवसेनेचा वाघ आहे. लोकसभा उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.