आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:KGN एलपीजी रिटेस्टिंग सेंटर 3 महिन्यांसाठी निलंबित; बोगस प्रमाणपत्र देणाऱ्यांवर गुन्हा

संतोष देशमुख|औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलपीजी गॅस सिलिंडरची तपासणी न करता पैसे घेऊन प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या केजीएन सेंटरचा परवाना आरटीओ अधिकाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. दिव्य मराठीने 14 जून रोजी या विषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल आरटीओ प्रशासनाने घेऊन हि कारवाई केली आहे. पैसे घेऊन प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या केजीएनच्या कर्मचाऱ्यावर 7 दिवसांमध्ये पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल होणार आहे. अन्यथा सेंटर चालकावर कारवाई होईल.

वाहन गरजेची वस्तू झाल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी पेट्रोल व डिझेलची मागणी वाढली. दुसरीकडे इंधन उत्पादनात घट होऊन किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलला योग्य पर्याय म्हणून एलपीजी गॅसवर वाहन चालवण्यास केंद्र व राज्य सरकारने मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने विशेष धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. परिणामी शहरातील एलपीजी गॅस सिलिंडर वाहनांची संख्या तीस हजारांवर जाऊन पोहोचली आहे. मात्र, गॅसवर वाहन चालवणे बॉम्ब सारखेच धोकादायक आहे. त्यासाठी दर पाच वर्षांनी एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांना सिलेंडरची हायड्रोटेस्टिंग अनिवार्य केली आहे. मात्र, हायड्रोटेस्टिंग सेंटर चालक सिलेंडरची तपासणी न करता आगाऊ पैसे घेऊन प्रमाणपत्र देत असल्याचे शोध वृत्त दैनिक दिव्य मराठीने 14 जून रोजी प्रसिद्ध केले होते. त्याची आरटीओ प्रशासनाने दखल घेऊन कारवाई केली आहे.

आरटीओ प्रमाणपत्र बघून सोडतात

आरटीओ विभागातील अधिकारी एलपीजी सिलेंडरची तपासणी कधी झाली, पेंट, लोगो आदीचे वास्तव बघत नाहीत. तर विना तपासणी पैसे देऊन घेतलेले बोगस कागदी प्रमाणपत्र बघून वाहनाचे पासिंग करतात व सोडून देतात. यामुळे प्रवासी, नागरिकांची सुरक्षा वेशीवर टांगली जात असल्याचे स्पष्ट झाले होते.

व्यवसायिक प्रमाणपत्रधारकांची कबुली

केजीएन सेंटरचे मालक नबी उमर खान पठाण यांनी कबूल केले की, एजन्सी कर्मचारी बाहेरच्या बाहेर वाहनांचे प्रमाणपत्र बनवून देत होते. याबाबत मी अनभिज्ञ आहे. दिव्य मराठीला बातमी आल्यानंतरच गैरप्रकार सुरू असल्याचे कळाले. प्रथमतः चुक लक्षात आली नाही. पण नंतर मला अंधारात ठेवून प्रमाणपत्र देणारे समजले असून त्यांच्या विरोधात सात दिवसाच्या आत पोलीस तक्रार दाखल केली जाईल. आरटीओंनी तीन महिन्यासाठी(24 ऑक्टबरपर्यंत)परवाना क्रमांक एम एच 20 टिसी 1102 परवाना निलंबित केला आहे. पोलिस कारवाई करण्याबाबत आरटीओ संजय मैत्रेवार यांनी सांगितले आहे.

अशी करावी हायड्रोटेस्टिंग

बाह्य व अंतर्गत 12 व्होल्ट लाईटच्या साह्याने सिलेंडरची तपासणी केली जाते. पीटमारक, डेन्ट, गंज, घाण आहे का ते कळते. सिलेंडच्या आतून हाय प्रेशराइज्ड वाटर जेट ने साफ केले जाते. लॉस ऑफ टेअरवेट कळते व आयुष्यमान ठरवले जाते. हायड्रोटेस्ट मधून सिलेंडर पाच वर्षांत फुटू शकतो का ते कळते. फुटणार असल्यास ते रिजेक्ट केले जाते. सर्व तपासणीत पास झाल्यावर त्यावर पेसो डिपार्मेन्टने ठरवून दिलेला कोड, काळा पेंट मारणे व तपासणीची तारीख टाकणे अनिवार्य आहे.

आरटीओ व पोलिसांची जबाबदारी

अशा प्रमारे टेस्ट होणे अनिवार्य असते. संबंधित विभागाने याची तपासणी करणे अनिवार्य असते. प्रत्यक्षात वाहनधारकांना याची माहिती नसते. अशा प्रकरच्या तपासणीसाठी वेळ लागतो. जास्तीचे पैसे देऊन विनातपासणी प्रमाणपत्र घेतली जातात. तर आरटीओ व पोलिस हे जबाबदार आहेत. परिणामी तपासणीविना प्रमाणत्र देण्याचे प्रमाण वाढत चालले असून यापासून प्रवासी, नागरीक, चालकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालेला आहे.

सिलेंडर हायड्रोटेस्टिंगचे फायदे

तपासणीनंतर सिलेंडर फुटण्याचा धोका टळतो. तपासणी न केल्यास पंपावर सिलेंडर भरून देत नाही. आरटीओ फिटनेस टेस्ट होत नाही. विमा संरक्षण कवच मिळत नाही. सिलेंडरच्या आतील घाण साफ झाल्यामुळे गाडीचे मेन्टन्स कमी होते. वाहनाचे आयुष्यमान वाढण्यास मदत होते. प्रवासी सुरक्षा अबाधित राहते.

बातम्या आणखी आहेत...