आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इंटरव्ह्यू, दिलीप वेंगसरकर:आर्थिक पाठबळाने युवा क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेला चालना; आता भारतीय संघ झाला बेंच स्ट्रेंथमुळे अधिक मजबूत

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय युवा खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव; मेहनतीतून सुपरस्टार खेळाडू समाेर

भारतीय क्रिकेट संघ जागतिक स्तरावर झपाट्याने प्रगती साधत आहे. बेंच स्ट्रेंथमुळेच टीम इंंडिया मजबूत झाली आहे. आर्थिक पाठबळामुळे युवा क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेला चालना मिळत आहे. यातून दर्जेदार खेळीतून हे युवा खेळाडू जागतिक स्तरावर लक्षवेधी कामगिरी करत आहेत. त्यामुळे संघाची आगेकूच कौतुकास्पद आहे, अशा शब्दात १९८३ विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी युवा क्रिकेटपटूंवर कौतुकाचा वर्षाव केला. ‘दिव्य मराठी’शी बोलताना वेंगसरकर यांनी करिअर व सध्याच्या युवांच्या कामगिरीवर चर्चा केली.

स्थानिक संघटनांमुळे युवांना प्रोत्साहन
भारतातील कानाकोपऱ्यामध्ये क्रिकेट या खेळाचा प्रसार आणि प्रचार झाला आहे. त्यामुळे दर्जेदार कामगिरी करणारे युवा क्रिकेटपटू गल्ली-बाेळातून समाेर आले. या सर्वांना प्रोत्साहन देण्याची महत्त्वाची भूमिका स्थानिक पातळीवरील क्रिकेट संघटना पार पाडत आहेत. या संघटनांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले. त्यामुळे लहान शहरांमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा युवांना मिळत आहेत. यातूनच गुणवंत खेळाडू समाेर येत आहेत. आमच्या काळात ग्रामीण आणि लहान शहरातील खेळाडूंना क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी महानगर गाठावे लागत हाेते. मात्र, आता परिस्थितीत प्रचंड सकारात्मक असा बदल झाला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

आता युवा खेळाडू सक्षम :
सध्याच्या घडीला भारतातील युवा क्रिकेटपटू आर्थिक स्वरूपात सक्षम झाले आहेत. बीसीसीआयकडूनही माेठ्या संख्येत मानधन दिले जाते. याशिवाय व्यावसायिक स्पर्धांमुळेही युवा क्रिकेटपटू काेट्यवधी रुपयांची कमाई करत आहेत. आमच्या काळात कसाेटी सामन्यासाठी आम्हाला हजार आणि रणजीसाठी एका दिवसाला २५ रुपये मिळत हाेते. त्यामुळे आमच्यासाठी नाेकरी हेच महत्त्वाचे साधन हाेते. नाेकरी करत खेळात आम्ही प्रगती साधत हाेताे. आता याच परिस्थितीत पूर्णपणे बदल झाला. युवांना आर्थिक पाठबळ मिळत आहे, असेही वेंगसरकर यांनी सांगितले. याशिवाय भारताचे युवा खेळाडू विदेशातील लीगमधूनही काेट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत.

कसाेटीमुळे उंचावली दर्जेदार कामगिरी
भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीमध्ये कसाेटी क्रिकेटचे माेलाचे याेगदान आहे. त्यामुळेच कसाेटी हेच टीम इंडियाचे ड्रायव्हिंग फाेर्स मानले जाते. सातत्याने सामन्यातील सहभाग आणि त्यातील विजयाने संघाला प्रगती साधता आली. यातून टीम इंडियाने २००७ आणि २०११ मध्ये विश्वविजेता हाेण्याचा बहुमान पटकावला, असेही ते म्हणाले.

युवा गटामुळेच दर्जेदार खेळाडू तयार
बीसीसीअाय युवांच्या दर्जेदार कामगिरीला उंचावण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला. आजच्या घडीला लाखाे गुणवंत युवा खेळाडू भारतात आहेत. याचाच प्रत्यय आयपीएल स्पर्धेदरम्यान येताे. भारतात आता १४, १६, २१ व २३ वर्षांखालील गटाचे खेळाडू सातत्याने आ​​​​​​​पल्या स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी करतात. यातून दरवर्षी रणजी ट्राॅफीत उल्लेखनीय कामगिरी करणारे युवा खेळाडू समाेर येतात,असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...