आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘प्रयास’:रुग्णांच्या आप्तांची अतिकाळजी ठरतेय डोकेदुखी; राज्यातील फ्रंटलाइन वर्कर्समध्ये अस्वस्थता, कामाचा प्रचंड ताण, मन मोकळं करण्याचीही सोय नाही

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील फ्रंटलाइन वर्कर्ससाठी ‘दिव्य मराठी’ ने सुरू केलेल्या ‘प्रयास’ अभियानाला चांगला प्रतिसाद लाभत आहे

राज्यातील फ्रंटलाइन वर्कर्ससाठी ‘दिव्य मराठी’ ने सुरू केलेल्या ‘प्रयास’ अभियानाला चांगला प्रतिसाद लाभत आहे. दोन दिवसांत शेकडो कॉल पॅनलमधील मानसोपचारतज्ज्ञांना आले. आरोग्य क्षेत्रातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे त्यांचे मन मोकळे केले, त्यांच्या व्यथा मांडल्या. रुग्णांवर उपचार करताना त्यांच्या नातेवाइकांच्या अतिकाळजीचाच अधिक त्रास होत असून, रुग्णांचे मनोबल वाढण्यासाठी त्यांची प्रकृती उत्तम आहे असे सांगितल्यावर बाहेरून पेशंटचे नातेवाईक त्यांना घाबरवून त्यांचे मनोबल कमी करत असल्याची चिंता आरोग्य क्षेत्रात कार्यरत अनेकांनी व्यक्त केली आहे.

हे आहेत मानसोपचारतज्ज्ञ
मानसोपचारतज्ज्ञ : तज्ज्ञांशी आपण सकाळी ११ ते ७ या वेळेत फोनवर संपर्क करू शकता. सोमवार ते शुक्रवार हे समुपदेशन केले जाईल. समुपदेशकांशी संपर्क करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील.
1. डॉ. संदीप सिसोदे 9890054518 2. डॉ. हेमंत सोननीस 9922069966
3. डॉ. अपर्णा अष्टपुत्रे 9923800937 4. डॉ. रवींद्र शिंदे 9404133468
5. सम्यका अँटोनी 8668940985 6. डॉ. इना नाथ 9325640613

अभियान केवळ ‘फ्रंटलाइन वर्कर्स’साठी
केवळ ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ यांनीच डॉक्टरांशी संपर्क करून आपल्या समस्या मांडाव्यात. यात डॉक्टर, नर्स, सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग, राज्य सरकार ,केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आदी डॉक्टरांची सेवा घेऊ शकतात. समस्या मांडणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

फ्रंटलाइन वर्कर्सच्या या आहेत व्यथा

  • अनेकांमध्ये कामाच्या ताणामुळे चिडचिड आणि आक्रमकता वाढतेय असे त्यांचे म्हणणे आहे.
  • १२-१२ तास काम करावे लागत असल्याने थकवा जाणवतो.
  • आपण करत असलेल्या कामामुळे आपल्या कुटुंबीयांना आपण धोक्यात तर घालत नाही ना, अशी भीती सतावतेय.
  • मनातील व्यथा, काही रुग्ण किंवा अधिकाऱ्यांकडून होणारा त्रास कुणालाच सांगता येत नाही. मन मोकळं करता येत नाही ही समस्या अनेकांनी बोलून दाखवली.
बातम्या आणखी आहेत...