आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी:दिव्य मराठी प्रॉपर्टी एक्स्पोचे आज उद्घाटन, 3 दिवस प्रदर्शन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठीच्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद‌्घाटन शुक्रवारी दुपारी १ वाजता बीड बायपासवरील जबिंदा ग्राउंड येथे होणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते उद‌्घाटन होईल. क्रेडाई औरंगाबादचे अध्यक्ष नितीन बगडिया, क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, सहसचिव क्रेडाई महाराष्ट्र नरेंद्रसिंग जबिंदा तसेच प्राइड ग्रुपचे संचालक नवीन बगडिया, नभराज ग्रुपचे संचालक राजेश बुटोले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

गणेशोत्सव, दसरा-दिवाळीत घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा एक्स्पो महत्त्वपूर्ण राहणार आहे. २ ते ४ सप्टेंबरपर्यंत तो चालेल. या प्रदर्शनात प्रमुख बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स असतील. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे गृहप्रदर्शनास दररोज भेट देणाऱ्यांसाठी गोल्ड कॉइन व इलेक्ट्रिक ई-बाइकचा बंपर ड्रॉ ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता काढण्यात येणार आहे. या प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक मनजित प्राइड ग्रुप तर सहप्रायोजक नभराज ग्रुप, सोशल मीडिया पार्टनर प्रो-मार्केटिंग हे आहेत.

प्रवेश, पार्किंग फ्री : या गृहप्रदर्शनात शहराच्या चारही बाजूंना असलेल्या, प्राइम लोकेशनवरील प्रॉपर्टींचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना आवडीचे घर, शॉप, रो-हाऊस, बंगलोज, प्लॉट आणि ऑफिस घेण्याची सुवर्णसंधी एकाच छताखाली मिळणार आहे. जबिंदा ग्राउंड येथील प्रदर्शनास प्रवेश आणि पार्किंग फ्री आहे. अधिक माहितीसाठी ७५०७७७७२१५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...