आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रांजणगावात येणारे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग  क्लस्टर औरंगाबादच्या उद्योगांनाही फायदेशीरच

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात ४९२.८५ कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा राज्य सरकारने मंगळवारी केली. हा प्रकल्प औरंगाबादेत झाला असता तर शहरातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला नक्कीच भरारी मिळाली असती. पण असा प्रकल्प मिळण्यासाठी त्या क्षेत्रातील मोठी गुंतवणूक असलेला प्रकल्प गरजेचा होता. तो औरंगाबादेत नसल्याने ही संधी मिळाली नाही. मात्र, असे असले तरीही रांजणगावातील प्रकल्पाचा औरंगाबादलाही फायदा होणार आहे, अशी आशा येथील उद्योजकांनी व्यक्त केली. पुण्यात आयएफबी कंपनीने गुंतवणुकीची तयारी दाखवत प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता. या प्रकल्पात औरंगाबादेतील उद्योजकांनाही उत्पादनाला आकार देता येणार आहे. औरंगाबादेत सध्य स्थितीला ५० इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आहेत, तर पुण्यात ५०० आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पुण्यात झाला. आगामी काळात सीडॅकच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स डिझाइनचा प्रकल्प औरंगाबादेत व्हावा यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी अपेक्षाही उद्योजकांनी व्यक्त केली.

देवगिरी ऑटो क्लस्टरचे प्रमुख सुरेश तोडकर म्हणाले, औरंगाबादेत डीएमआयसीत मुबलक जागा आहे. असे प्रकल्प आल्यास उद्योगांना बुस्ट मिळेल. पुण्यातील रांजणगावात आलेला प्रकल्प आपल्यासाठी उत्तमच आहे. कारण त्या ठिकाणी मोठे अँकर प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे प्रकल्प लवकर गतिमान होतो. औरंगाबादेत अँकर प्रोजेक्ट आल्यास इलेक्ट्रॉनिक्स उद्योग गरुडझेप घेईल.

सध्याचा पुण्याचा निर्णय याेग्यच : राम भोगले ज्येष्ठ उद्योजक राम भोगले म्हणाले, हा प्रकल्प पुण्यात गेला. हा निर्णय उद्योगाचा विचार करता योग्य आहे. कारण पुण्यात ७० च्या दशकात इलेक्ट्रॉनिक्स उद्याेगाला सुरुवात झाली. ५० वर्षांची दीर्घ परंपरा आहे. याशिवाय चंद्रशेखर हे या इंडस्ट्रीशी परिचित असलेले व्यक्ती असल्याने त्यांचा उत्तम अभ्यासही आहे. सरकार इतका मोठा प्रकल्प आणेल तर त्यांना त्यातून लवकरात लवकर आऊटपुट मिळणे अपेक्षित आहे. औरंगाबादेत पुढील ५ वर्षांत उत्तम वातावरण होईल. कारण सध्याचे एक क्लस्टर आपण सुरू केले आहे. पण सद्य:स्थितीला पुण्याचा निर्णय योग्य आहे असेच म्हणावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...