आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्यावर परिणाम:दिव्य मराठी विशेष तंत्रज्ञानाने रिमाेट वर्किंग बनवले सहज, पण इतर अडचणी

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिमाेट वर्किंगमध्ये आठवड्यात ८ जास्त बैठका रिमाेट वर्किंगदरम्यान कर्मचारी आठवड्यात सरासरी ८ पेक्षा जास्त बैठकांमध्ये सहभागी हाेतात. कार्यालयात अशा बैठकांची संख्य कमीपरंतु त्याचा कालावधी जास्त असताे. त्याशिवाय कर्मचारी सहकाऱ्यांशी कामाबाबत जास्त चर्चा करतात.आधुनिक तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांसाठी रिमाेट वर्किंग सहज बनली आहे. आता कर्मचारी कार्यालयापासून दूर असूनही काम करत असतात. निम्मे कर्मचारी सुटीवर असतानाही दरराेज किमान तासभर कार्यालयीन कामासाठी देतात. एक चतुर्थांश कर्मचारी दिवसातील तीन तास काम करतात. परंतु ही गाेष्टी मानसिक आराेग्यासाठी चांगली आहे का? हार्वर्ड स्टडी आॅफ अडल्ट डेव्हलपमेंटचे संचालक राॅबर्ट वाल्डिंगर म्हणाले, कर्मचाऱ्यांचे आराेग्य व त्यांच्या भलाईसाठी सुटीदरम्यान कामापासून पूर्णपणे विलग हाेणे गरजेचे आहे. पाहणीत आणखी एक बाब स्पष्ट झाली. रिमाेट वर्किंगमध्ये सहकाऱ्यांमधील संभाषणात वाढ झाली आहे. त्यातून उत्पादकतेत वाढ झाली आहे.

तरी देखील सुट्टीची गरज असते. म्हणजेच ते काेणत्याही काॅलवर असू नयेत. सुटीची वेळ विश्रांती व ताजेतवाने हाेण्यासाठी सर्वाेत्तम मानली गेली आहे. टाइम मॅनेजमेंट काेच एलिझाबेथ ग्रेस साँडर्सच्या सल्ल्यानुसार कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे तीन बकेट बनवले पाहिजेत. सुटीवर जाण्याआधी व साइन आउट करण्यापूर्वी आपण करत असलेली कामे थांबू नयेत. तशी व्यवस्था केली पाहिजे. त्यासाठी सहकाऱ्यांची मदत घेऊ शकता. त्यामुळे विश्रांती वनिाअडथळा घेता येईल. त्यासाठी एक यादी तयार करावी. ती दाेनवेळा पडताळावी. मन:शांती हवी असल्यास चेकलिस्ट बनवा. त्यात एकही काम शिल्लक राहणार नाही, याची खात्री करून घ्या.

बातम्या आणखी आहेत...