आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णसंधी:दिव्य मराठीतर्फे उद्या टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षा ; नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस, करिअर मार्गदर्शनही

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दैनिक दिव्य मराठीतर्फे विभागीय स्तरावर दिव्य मराठी टॅलेंट सर्च परीक्षा (डीटीएसई) १८ डिसेंबर रोजी शिवछत्रपती कॉलेज, एन- ३, सिडको येथे होणार आहे. परीक्षा सकाळी ९.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान होणार आहे. १७ डिसेंबर रोजी नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. यात विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी करीअर मार्गदर्शनही होणार आहे. ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असेल. गणित, विज्ञान व बौद्धिक क्षमतांवर आधारित असेल. प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमांतून असणार आहे. या परीक्षेतील गुणवंतांना ग्रेडनुसार ६० हजार ते ९० हजार रुपयांची स्कॉलरशिप, विविध प्रकारची बक्षिसे दिली जाणार आहेत.

सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास मोबाइल, द्वितीय विद्यार्थ्यास स्मार्टवॉच, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यास ब्ल्यूटूथ हेडसेट देण्यात येईल. पहिल्या तीस विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि स्कॉलरशिप दिली जाईल. याव्यतिरिक्त ३० विद्यार्थ्यांना ग्रेडनुसार स्कॉलरशिप देण्यात येईल. प्रवेश मर्यादित असल्याने नोंदणी आवश्यक आहे. यासाठी ७७२२०५०८५५ किंवा ९७६७७५८३३३ नंबरवर संपर्क साधावा. परीक्षेला येताना पेन, रायटिंग पॅड, रफ पेपर्स व पाण्याची बॉटल घेऊन यावे.

बातम्या आणखी आहेत...