आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दरवर्षी नव्याने लागवड; वडाच्या झाडालाच आयुष्य मिळवून देणारी आधुनिक सावित्री

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक
  • चंद्रपूरच्या योगिताची वृक्षारोपणासाठीची अनोखी मोहीम

अाजच्या घडीला महिला सात जन्मापर्यंत पतीची साथ मिळावी म्हणून वटपाौर्णिमेची पूजा दरवर्षी माेठ्या भक्तिभावाने करताना दिसतात. मात्र, चंद्रपूरची याेगिता साठवणे-भाेंगाडे याच पौर्णिमेला दरवर्षी वडाच्या झाडाला सात जन्मापर्यंतचे अायुष्य लाभावे यासाठी धडपडताना दिसली. दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्याने वडाचे झाड लावून या आधुनिक सावित्रीने वटपौर्णिमा साजरी केली. यातून या वडाच्या झाडांना नव्याने आयुष्य मिळते. चंद्रपूरच्या या ४० वर्षीय विवाहित याेगिताने अातापर्यंत १५ वडाची झाडे लावली अाहेत.

याच वड लागवडीच्या माेहिमेतून तिने अापल्या अाप्तेष्ट अाणि मैत्रिणींनाही प्रेरणा दिली. त्यामुळे अाता नव्याने विवाहबद्ध झालेल्या मैत्रिणीही या माेहिमेत सहभागी झाल्या अाहेत.चंद्रपूर येथील याेगिता सध्या बांबू संशाेधन व प्रशिक्षण केंद्रात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत अाहे. लहानपणापासून वृक्षलागवड अाणि संवर्धनासाठी तिचा प्रयत्न असताे. यातूनच तिने अापल्या घरी माेठ्या संख्येत झाडे लावली अाहेत. यातून तिने परिसरात पिंपळ, अांबा, अावळ्याची झाडे लावलेली अाहेत.

सध्या इतर जातीची झाडे माेठ्या संख्येत लावली जातात. मात्र, वडाचे झाड लावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सर्वाधिक दीर्घायुषी असलेल्या या झाडाचीही संख्या वाढावी अाणि त्याचे अस्तित्व कायम राहावे यासाठी मी दरवर्षी वडाचे झाड लावते. यातून इतरांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे नव्याने विवाहबद्ध हाेणारी जाेडपीही या माेहिमेत सहभागी हाेण्यासाठी प्रेरित हाेतात, असेही याेगिताने सांगितले.

सासर-माहेरचीही साथ
वडाचे झाड लावण्याच्या माेहिमेसाठी याेगिताला अापल्या सासर अाणि माहेरच्यांचेही पाठबळ मिळत अाहे. यातून तिने माहेर अाणि सासरच्या अंगणात पिंपळ, बेल, उंबरासह माेठ्या संख्येत फुलझाडेही लावली अाहेत. यादरम्यान केलेल्या मार्गदर्शनातून मैत्रीण नीलिमा शात्रकार यांनीही अापल्या घरी अशी झाडे लावली अाहेत.

सप्तपदीनंतर वड लागवड मोहिमेचा उचलला विडा
पारंपरिक पद्धतीनुसार लग्नानंतर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करावी अशी अलिखित प्रथा अाहे. तिचे डिसेंबर २००४ मध्ये लग्न झाले. यातून याेगिताने लग्नानंतर वडाची झाडे लावण्याच्या अापल्या माेहिमेला सुरुवात केली. सप्तपदीनंतरच्या पहिल्याच वटपौर्णिमेला तिने वडाच्या झाडाची पूजा केली अाणि परिसरामध्ये वडाचे नवीन झाडही लावले. अाता दरवर्षी नियमितपणे ती वडाचे झाड लावते. यातून या परिसरामध्ये अाता वडाच्या झाडांची संख्या वाढत अाहे. याशिवाय वडाच्या झाडाची निगा राखण्यावरही तिचा अधिक भर असताे. यातूनच अापल्या गावाच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाचे संवर्धन याेग्य प्रकारे व्हावे यासाठीही तिचा प्रयत्न सुरू अाहे.

बातम्या आणखी आहेत...