आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘सध्या मास्क हीच खरी लस’:दै.‘दिव्य मराठी’च्या देशातील सर्वात मोठ्या मास्कची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‌्समध्ये नोंद

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सध्या मास्क हीच खरी लस’ अभियानांतर्गत औरंगाबादेत एकूण 3 ठिकाणी मास्क

दै. दिव्य मराठीने देशातील सर्वात मोठा मास्क बनवण्याचा अनोखा विक्रम डॉ. अमोल चाटे (चाटे होमिओपॅथी) यांच्या सौजन्याने केला असून याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‌्समध्ये झाली आहे.

हा मास्क थ्रीडी असून याची रुंदी ४२ फूट, तर उंची २५ फुटांची आहे. या मास्कचे ऐतिहासिक महानगरी औरंगाबाद शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या क्रांती चौकात औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २० जानेवारी २०२१ रोजी उद्घाटन केले. याव्यतिरिक्त दोन असेच मास्क शहरातील प्रोझोन मॉल आणि सिडको उड्डाणपुलाजवळ प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. हे मास्क नागरिकांना पाहण्यासाठी महिनाभर खुले असतील.

सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर (एसएमएस) या त्रिसूत्रीच्या बळावर गेली ९ – १० महिने आपण कोरोनाविरोधी लढाई लढली. आता संसर्ग प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र तरीही धोका टळलेला नाही. लसीकरण झाले तरी मास्क मात्र आपल्याला वापरावाच लागणार आहे. याबाबत शहरात जनजागृती करण्यासाठी दै. दिव्य मराठीने हा उपक्रम राबवला आणि शहरातील ३ ठिकाणी मोठी सुंदर मास्कची प्रतिकृती लावण्यात आली आहे. ‘मास्क लावा, कोरोना टाळा’ असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...