आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृह प्रदर्शनातील स्टाॅलला भेट:दिव्य मराठीच्या प्रॉपर्टी एक्स्पोचा रविवारी उदंड प्रतिसादात समारोप

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक दिव्य मराठीच्या प्रॉपर्टी एक्स्पोचा ४ सप्टेंबर राेजी बीड बायपासवरील जबिंदा ग्राउंड येथे समारोप झाला. गणेशोत्सवातील रविवारची सुटी आणि महालक्ष्मीच्या महापूजेच्या दिवशीही हजारो लाेकांनी गृह प्रदर्शनातील स्टाॅलला भेटी देऊन बुकिंग केले. आता सर्वच बांधकाम व्यावसायिकांना उत्तम बुकिंग मिळणार आहे, असे आश्वासक चित्र निर्माण झाल्याने बांधकाम व्यावसायिकही सुखावल्याने क्रेडाई संघटना आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील मरगळच दूर झाली आहे.

प्रॉपर्टी एक्स्पोचे मुख्य प्रायोजक मनजित प्राइड ग्रुप तर सहप्रायोजक नभराज ग्रुप, सोशल मीडिया पार्टनर प्रो- मार्केटिंग हे होते. २ सप्टेंबरला एक्स्पाेचे उद्घाटन झाले हाेते. तीन दिवसांत प्रदर्शनास भेट देणाऱ्या ग्राहकांना आकर्षक भेट वस्तूंसह दररोज सोन्याची नाणीही भेट देण्यात आली. घर बुक करणाऱ्या एका भाग्यवान ग्राहकास बम्पर लकी ड्रॉच्या माध्यमातून ई स्कूटर बक्षीस मिळणार आहे. रविवारी बांधकाम व्यावसायिक व बँकांच्या प्रतिनिधींना दिव्य मराठीचे युनिट हेड बेंजामीन रॉक यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली. या वेळी जाहिरात उपव्यवस्थापक सोमनाथ भंडे, उपक्रम उपव्यवस्थापक भालचंद्र सोनार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...