आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुढीपाडव्याला आपले स्वप्नातले घर खरेदी करता यावे यासाठी ‘दैनिक दिव्य मराठी’ने शहरवासीयांसह जिल्हा व संपूर्ण मराठवाड्यातील घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही १६ ते १९ मार्चदरम्यान दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो-२०२३ चे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात तसेच मुंबई-पुणे येथे गुढीपाडव्याला गृहप्रवेश निश्चित करायचा असेल आणि तोही आपल्या बजेटमध्ये तसेच भेटवस्तूंसह याचा लाभ घ्यायचा असेल तर या प्राॅपर्टी एक्स्पोचा लाभ घेता येईल. एसएफएस ग्राउंड, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या या प्रदर्शनात अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिक व गृहकर्ज देणाऱ्या बँका सहभागी होणार आहेत. चारही दिवस या प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत असेल. या गृह प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक मनजित व प्राइड समूह हे आहेत. सहयोगी प्रायोजक शक्ती लाइफ स्पेसेस, नभराज ग्रुप, तर सहप्रायोजक बिझ टॉवर हे आहेत. अाॅटोमोबाइल पार्टनर डिलक्स सुझुकी आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स पार्टनर ट्रिकी रोव्हर हॉलिडे हे आहेत.
अनेक आकर्षणे असणाऱ्या या भव्य दिव्य प्रॉपर्टी एक्स्पोत प्रवेश मोफत असेल. प्रदर्शनास भेट देणाऱ्या भाग्यवंतांना दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून सोन्याचे नाणे मिळणार आहे. सर्व चार दिवस प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना सुपर लकी ड्रॉमधील प्रथम भाग्यवंत विजेत्यास इलेक्ट्रिक स्कूटरचे बक्षीसही जिंकण्याची संधी आहे. इतर बक्षिसांमध्ये फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन असून एका भाग्यवान कुटुंबाला मनाली टूरचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. या प्रदर्शनात आपल्याला सर्व लोकेशन्सचे पर्याय उपलब्ध असतील. प्रदर्शनात सर्व बजेटचे गृह प्रकल्प, अनेक नावाजलेले बिल्डर्स असून साइट व्हिजिट सुविधा उपलब्ध आहे, किड्स झोन व फूड झोनही आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.