आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’चा उपक्रम:भयाचा अंधार भेदण्यास सज्ज होणार ‘रातरागिणी’

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलांना आवाहन : आयुष्य झाकोळणाऱ्या भीतीवर कशी मात केली हे सांगणारा व्हिडिओ पाठवा

शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या मुलींपासून कोणत्याही क्षेत्रात काम करणारी महिला असो की कुटुंब सांभाळणारी गृहिणी.. जवळपास प्रत्येकीला कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या भीतीचा सामना करावा लागतो. स्त्री म्हणून जगताना मनावर दाटणारे असे भयाचे सावट अनेकदा आयुष्य झाकोळून टाकते. मात्र, अनेक जणी अशा भीतीवर हिमतीने आणि हिकमतीने मात करतात. तुमच्याही बाबतीत असा एखादा प्रसंग घडला असेल आणि तुम्ही त्याला धैर्याने सामोरे गेला असाल तर त्याची कहाणी सांगणारा तुमचा व्हिडिओ आम्हाला पाठवा. ‘दिव्य मराठी’च्या देशभर चर्चा झालेल्या ‘रातरागिणी’ अभियानातील यंदाच्या अनोख्या, ऑनलाइन उपक्रमात आम्ही तुम्हाला विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.

हैदराबाद येथे पाशवी अत्याचारानंतर डॉक्टर तरुणीची झालेली हत्या आणि देशभरात लागोपाठ घडणाऱ्या तशाच घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ‘दिव्य मराठी’ने “रातरागिणी’ हे महिलांचे आत्मबल वाढवणारे अभियान सुरू केले. वर्षातील सर्वात मोठी रात्र असलेल्या २२ डिसेंबरला अंधारावर मात करण्याच्या निर्धाराने राज्यातील हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. आम्ही स्वतंत्र आहोत, सबला आहोत, निर्भय आहोत आणि म्हणूनच आता अंधाराला घाबरणार नाही, उलट तो भेदून पुढे जाऊ, असा निर्धारच त्यांनी केला. यातून महिलांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान काही पटींनी वाढला. या अभियानाने स्त्रीशक्तीच्या उत्स्फूर्त अभिव्यक्तीचा नवा मानदंड निर्माण केला.

‘रातरागिणी’च्या निमित्ताने गेले वर्षभर महिलांशी झालेल्या संवादातून असंख्य कहाण्या पुढे आल्या. कुणी अज्ञानरूपी अंधाराला संपवण्यासाठी दिलेला लढा, तर कुणी अन्याय-असुरक्षिततेतून आलेल्या भीतीवर जिद्दीने केलेली मात. कधी ही भीती भोवतालच्या विखारी नजरांची, तर कधी बालपणातील एखाद्या काळ्या अनुभवाची. कधी स्वत:तील आत्मविश्वासाच्या उणिवेची, तर कधी चारी बाजूंनी घेरणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीची.

अशा भीतीवर मात करण्याचा प्रत्येकीचा संघर्ष आगळावेगळा असला तरी त्यांच्या या कहाण्या एकमेकींना प्रेरणा देणाऱ्या आणि आत्मसन्मानाने उभे राहण्याची ताकद देणाऱ्या ठरतील. त्यासाठीच आम्ही तुम्हाला अभिव्यक्त होण्याचे आवाहन करीत आहोत. आयुष्यातील कोणत्या भीतीवर तुम्ही कशी मात केली हे सांगणारा स्वत:चा व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. निवडक कहाण्यांचा समावेश येत्या २२ डिसेंबरच्या ऑनलाइन उपक्रमात केला जाईल. या अभियानाचा अन्य तपशीलही आम्ही लवकरच जाहीर करू. तर मग चला, ‘रातरागिणी’मध्ये सहभागी व्हा!

खालीलपैकी केवळ एका व्हॉट्स अॅप क्रमांकावर व्हिडिओ पाठवा:
- वंदना धनेश्वर : ९३४००६१६२९
- मिनाज लाटकर : ७०५८९४००५४
- उषा बोर्डे : ९६७३२०५९३२
- मोहसीना सय्यद : ८९५६८४५३९३

व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत : १६ डिसेंबर २०२०
असा असावा व्हिडिओ

- चित्रीकरण करताना कॅमेरा फ्रेम आडवी ठेवा. - फ्रेममध्ये हेडस्पेस (वरून जागा) सोडा. - चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश असावा. - चित्रीकरण आणि आवाज सुस्पष्ट असावा. - प्रारंभी तुमचे आणि शहराचे नाव सांगा. - हा व्हिडिओ एक मिनिटाचा असावा.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser