आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक दिव्यांग दिनानिमित्त गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये दिव्यांगांसाठी बाल आनंद मेळावा झाला. यात मनोरंजनात्मक खेळ, हस्तकला, चित्रकला यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली.छावणी परिषद, उडान पुनर्वसन केंद्र आणि गरवारे कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गरवारे कम्युनिटी सेंटर छावणी येथे हा आनंद मेळावा घेण्यात आला. दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी, दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या उद्धारासाठी मदत मिळावी, यासाठी याप्रसंगी चित्रकला, हस्तकला, मेंदी, विविध कोड्यांवर आधारित खेळ, मासे पकडणे, मनोरंजनात्मक व बौद्धिक खेळ घेण्यात आले. यामध्ये ५५ मुलांनी सहभाग घेत कलागुणांना वाव दिला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, डॉ. विनोद धामंदे, सदस्य प्रशांत तारगे, गरवारे सेंटरचे संचालक सुनील सुतवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.