आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी सुट्या:शाळांना 17, तर कॉलेजांना 20 पासून दिवाळी सुट्या

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शाळांना १७, तर महाविद्यालयांना २० ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुट्या लागणार आहेत. या दिवाळीच्या सुटीपूर्वी ६ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये प्रथम सत्र परीक्षा सुरू होत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना १७ ऑक्टोबरपासून सुट्या देण्यात येणार असून ९ नोव्हेंबरपासून पुन्हा शाळांमध्ये वर्ग भरण्यास सुरुवात होईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

गणेशोत्सव, नवरात्र, दसऱ्यानंतर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दिवाळी सणाचे वेध लागतात. काेराेनामुळे गेली दोन वर्षे सण-उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. परंतु, यंदा सर्व उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जात आहेत. त्यामुळे यंदा शाळा-कॉलेजांतही दिवाळीच्या सुट्यांचे नियोजन केले असून त्याच्या तारखादेखील शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. कॉलेजांमध्ये पदवी स्तरावरील आणि ज्युनियर कॉलेजच्या सत्र परीक्षा ४ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. महाविद्यालयांना २० ऑक्टोबरपासून सुट्या लागतील. त्यानंतर ३ नोव्हेंबरपासून पुन्हा कॉलेजांमध्ये तासिक सुरु होतील.

बातम्या आणखी आहेत...