आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून दिवाळीच्या सुटी संपणार:विद्यापीठ, कॉलेजच्या तासिका 4 नोव्हेंबरपासून नियमित सुरू होणार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय कामाला आता सुरूवात झाली आहे. दिवाळीच्या सात दिवसांच्या सुट्या होत्या. त्या आता संपल्या आहेत. विद्यापीठातील सर्व प्रशासकीय विभागांचे निमयित कामकाज सुरू झाले आहे. विद्यापीठातील शैक्षणिक विभाग, संलग्नित कॉलेज, उस्मानाबाद उपकेंद्रातील शैक्षणिक विभागांच्या सुट्याही 3 नोव्हेंबरला संपणार आहेत. 4 नोव्हेंबरपासून नियमित तासिकांना सुरू होणार आहे.

विद्यापीठात सध्या पदवीधर अधिसभा निवडणूकांचे वारे वाहते आहे. 2 आणि 3 नोव्हेंबरला उर्वरित मतदारसंघाच्या मतदार यादीवर अंतिम आक्षेपांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठात कामाची जोरात लगबग सुरू आहे. त्याशिवाय सर्व प्रशासकीय विभाग, राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवन येथील परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे कामकाजही नेहमी प्रमाणे सुरू झाले आहे. विद्यार्थी आता कुठल्याही कामासाठी परीक्षा भवनात येऊ शकतात. उस्मानाबाद उपकेंद्रातील 10 शैक्षणिक विभाग आणि उस्मानाबाद, बीड, जालना आणि औरंगाबाद या ४ जिल्ह्यातील 464 संलग्नित कॉलेजांना 15 दिवसांच्या दिवाळी सुट्या होत्या. 3 नोव्हेंबर हा सुटीचा अखेरचा दिवस असेल. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील 45 शैक्षणिक विभाग आणि उस्मानाबाद उपकेंद्रातील 10 शैक्षणिक विभागांच्या तासिका 4 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. कॉलेजच्या तासिकाही 4 नोव्हेंबरपासूनच सुरू होतील.

इंग्रजी स्टेट बोर्डाच्या उघडल्या

जिल्हा परिषद, मनपा आणि खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांना 22 दिवसांच्या सुट्या होत्या. या शाळांना आणखी 7 दिवसांच्या सुट्या आहेत. 8 नोव्हेंबरला गुरूनानक जयंती आहे. त्यामुळे 9 नोव्हेंबरला शाळा सुरू होऊन नियमित तासिकाही सुरू होतील. इंग्रजी स्टेट बोर्ड माध्यमाच्या शाळा 1 नोव्हेंबरपासून उघडल्या आहेत. कारण इंग्रजी व सीबीएसई शाळांना नाताळात सात ते दहा दिवसांच्या सुट्या असतात. त्यामुळे त्यांनी दिवाळीत सात दिवसांच्या सुट्या कमी घेतल्या आहेत.1 नोव्हेंबरपासून या शाळांचे वर्ग सुरू झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...