आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानायलॉन मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी नागरिकांमध्ये जाणीव जागृतीसाठी पथनाट्यांचे सादरीकरण करीत आहेत. शासनाने बंदी आणलेला हा मांजा विकू नका आणि खरेदी करू नका असे आवाहन यातून ते करीत आहेत. महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी विद्यालयात याचा पहिला प्रयोग झाला. यावेळी शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी विद्यार्थ्यांसोबत नायलॉन मांजा वापरणार नाही याची शपथ दिली.
या पथनाट्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर नायलॉन मांजामुळे रस्त्याने चालणाऱ्या महिलेचा झालेला अपघात, पक्षांना झालेली इजा, झाडांना होणारी इजा इ.प्रसंगाद्वारे पथनाट्य सादर करत विद्यार्थ्यांमध्ये नायलॉन मांजा वापरायचा नाही याबाबत जागृती केली जात आहे. या पथनाट्याचे लेखन मदन मिमरोट यांनी तर दिग्दर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा महाजन व प्रकाश इंगळे यांनी केले आहे.
या पथनाट्याचे प्रयोग शहरातील सर्व चौकांमध्ये करण्याचे शाळेचे नियोजन आहे. यावेळी सीबीएसई विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे व विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. विशाल वाहूल, आशिष म्हस्के ,धीरज बर्गे, अरविंद म्हस्के, रोहन इंगोले, संजय इंगोले, भागवत राऊत, रूपाली गोसावी व अंजली मुगदल या विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.