आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अकरावीचे प्रवेश कॉलेजस्तरावर करु नका; शिक्षण संचालनालयाच्या सूचना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास

कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. अंतर्गत मूल्यमापनाआधारे दहावीचा निकाल लावण्यात येणार असल्याचे शिक्षण मंडळाने कळवले आहे. असे असताना काही ज्युनिअर कोलेजकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आले आहे. कोणत्याही ज्युनिअर कॉलेजांनी अकरावीची प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करू नये अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी व आयटीआयचे प्रवेश सुरु होतात. पंरतू, यंदा कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाआधारे विद्यार्थ्यांना निकाल लावण्याबाबत शिक्षण मंडळाकडून प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर विद्यार्थ्यांन निकालपत्रक दिले जाणार आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप कोणतीही कार्यपद्धतीने शिक्षण विभागाकडून अंतिम करण्यात आलेली नाही. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात अकरावीचे प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. तरीदेखील काही ज्युनिअर कॉलेजकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविणे सुरु होते. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, राज्यात शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर शासन आदेश आल्यानंतर जुनिअर कॉलेजांना कळविण्यात येईल. तत्पूर्वी कोणत्याही कॉलेजनी प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू येऊ नये. विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होईल, अशा कोणत्याही सूचना देऊ नयेत, असे स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...