आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस टोळ्या:निवडणुकीच्या नावाखाली कौटुंबिक माहिती देऊ नका

औरंगाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकीच्या नावाखाली शहरात सर्व्हे करणाऱ्या बोगस टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गुन्ह्याच्या उद्देशाने ते घरोघरी फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. त्यामुळे निवडणूक आयोग किंवा प्रशासनातर्फे अशी कुठलीही माहिती गोळा केली जात नाही. निवडणुकीच्या अनुषंगाने घरी कोणीही आल्यास माहिती देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून निवडणुकीच्या नावाखाली माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने काही लोक घरोघरी जात आहेत. निवडणुकीसाठी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे म्हणून ते घरातील सदस्यांची माहिती विचारत आहेत. घरात किती लोक आहेत, कोण काय काम करते, मोबाइल नंबर आदी विषयी विचारपूस करण्याचे प्रकार समोर आले. अशा लोकांकडून गंभीर गुन्हा केला जाऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे असे कोणीही आल्यास कुठलीही माहिती देऊ नये. त्यांच्याकडे आधी ओळखपत्राची मागणी करा, शहानिशा करा. संशय आल्यास लगेच पोलिसांना फोन करा, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...