आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत निवासी डॉक्टरला नातेवाईकांची मारहाण:सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे डाॅक्टर संतप्त; मार्डचे आजपासून काम बंद आंदोलन

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात मंगळवारी मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली. वार्ड क्रमांक 17 मधील निवासी डॉक्टरला मारहाण झाली असून रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे.

निवासी डॉक्टरांनी या मारहाणीच्या निषेधार्थ आज बुधवारपासून संप पुकारला जात आहे, अशी माहिती मार्ड संघटनेचे अध्यक्ष अक्षय क्षीरसागर यांनी दिली आहे. मार्ड संघटनेच्या वतीने सातत्याने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मागण्या करण्यात आल्या होत्या मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वारंवार डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा संप पुकारण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

मार्ड संघटनेच्या वतीने वार्ड मध्ये सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात यावेत तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बंद आहेत त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच रुग्णाच्या नातेवाईकाला अटक केल्याशिवाय काम सुरू करणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

घाटी प्रशासनाला वारंवार सुरक्षेचे बाबत सांगितल्यानंतरही अटींचे पालन होत नाही त्यामुळे निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. घाटीत येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे घाटीत पास सिस्टीम राबविण्यात यावी अशी मागणी मार्ड संघटनेच्या वतीने वारंवार करण्यात आली आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. याबाबत डॉक्टरची बैठक घेण्यात येणार असून प्रशासन सोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे मार्डच्या वतीने सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...