आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक:ट्रक-दाेन कार अपघातात डॉक्टर ठार ; रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली

गंगापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर-वैजापूर रस्त्यावर वरखेड फाटाजवळ एक ट्रक व दोन कारच्या विचित्र अपघात एक ठार, तर ६ गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील पार्डी येथील रहिवासी असून डॉ. कैलास हेमाडे (४५) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

वैजापूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारा ट्रक (एमएच ०४ ईबी ६७१२) बिघाड झाल्याने उभा हाेता. दरम्यान, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कार (एमएच २० एफजी ०४०२) व कार (एमएच ४६ डब्ल्यू ७७३१) यांच्या जाेराची धडक झाली. एक ट्रक वैजापूरहून गंगापूरकडे येत असताना बिघाड झाल्याने रस्त्यामध्ये उभा हाेता. नांदेडहून शिर्डीकडे जात असताना स्विफ्ट कार व वैजापूरहून औरंगाबाद येत असताना दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. यात दोन लहान मुलांसह तीन मोठ्या व्यक्ती जखमी झाल्या. जखमींमध्ये गोविंद भांगे (४०), करण पवार (२३), प्रदीप बसवंते (२५), साईसमर्थ भांगे (९ वर्षे) प्रेम बंडाळे (५ वर्षे), सूर्यकांत बंडाळे (३५, सर्व रा. पार्डी, ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...