आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानसिक छळ:डॉक्टर विवाहितेचा मानसिक छळ; उच्चशिक्षित डॉक्टर कुटुंबावर गुन्हा

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या डॉक्टर विवाहितेचा उच्चशिक्षित डॉक्टर पतीनेच मानसिक छळ करून घराबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पती डॉ. चेतन शिंदे, सासरा प्रल्हादराव रामराव शिंदे, लक्ष्मणराव खरोडे, कल्याण पंडितराव कणके यांच्या विरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जानेवारी २०१९ मध्ये तक्रारदार महिला व चेतन यांचे लग्न झाले. त्या सध्या जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरचे शिक्षण घेतात. महिलेच्या माहेरच्यांनी लग्नात खूप खर्च केला. सोन्याचे दागिने, महागड्या वस्तूदेखील दिल्या. मात्र, काही दिवसांनंतरच लग्न चांगले न लावल्याचा आरोप करत सासरच्या लोकांकडून तिला त्रास देणे सुरू केले.

पतीने मारहाणही सुरू केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. २६ जुलै २०१९ रोजी तिला घराबाहेर काढण्यात आले. त्यानंतरही विवाहितेने समजुतीने घेत पुन्हा सासरीच राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, नोव्हेंबर महिन्यातच तिला पुन्हा घराबाहेर काढले. त्यानंतर पतीने घटस्फोट मागितला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने सातारा पोलिसांकडे तक्रार केली. उपनिरीक्षक अनिता फासाटे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...