आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:मुंबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डॉक्टर तरुणीवर बलात्कार; मित्रांना घरी पाठवून 10 लाख रुपयांची केली मागणी

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मैत्री केली. नंतर मित्रांच्या फ्लॅट, हॉटेलवर नेऊन बळजबरीने अत्याचार करून छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत डाॅक्टर तरुणीस दहा लाख रुपये मागून ब्लॅकमेल केले. पैशांसाठी तरुणाने पीडितेच्या घरी मित्रांना पाठवून धमकावणे सुरू केले. अखेर गुरुवारी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अजहर अश्पाक शेख (रा. घाटकोपर) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे मागायला गेलेल्या ओसामा खान व हमजा पठाण यांचादेखील आरोपींमध्ये समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी मैत्रिणीच्या लग्नात आरोपी अजहर शेख, त्याची आई सायरा शेखसाेबत पीडितेची ओळख झाली होती. तेव्हा अजहरने तिचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर संपर्क वाढवून एअरलाइन कंपनीत ओळख असून चांगल्या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.

काही दिवसांनी तू मला आवडतेस, तुझ्याशी लग्न करायचे आहे, अशी मागणी घातली. सौदी एअरलाइन्समध्ये नोकरी लावतो, असेही सांगितले. ४ ऑक्टोबर २०२० रोजी अजहर शहरात आला. सौदीत जाण्यासाठी व्हिसा काढून देतो, असे सांगून आधार कार्ड व इतर कागदपत्र घेतले. २१ नोव्हेंबर २०२० रोजी सेवन अॅपल हॉटेलवर जेवण करण्यासाठी बोलावून घेत अत्याचार करून तिचे छायाचित्र काढले होते.

मित्रांना घरी पाठवून १० लाख रुपये मागितले
पीडितेला तिचे खासगी छायाचित्र आई-वडिलांना पाठवून व्हायरल करण्याची धमकी देत दहा लाखांची मागणी केली. पाच दिवसांपूर्वी दोन मित्रांना तिच्या घरी पाठवून पैशांची मागणी केली. पहाटे आई-वडिलांच्या मोबाइलवर छायाचित्र पाठवले. त्यामुळे तरुणीने सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्याकडे तक्रार केली.

बातम्या आणखी आहेत...