आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत निवासी डॉक्टरला मारहाण:खाजगी दवाखान्याच्या धर्तीवर पास सिस्टिम लागू करणार, 2 नातेवाईकानांच मिळणार प्रवेश

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीतील निवासी डॉक्टर उदय चेंदूर यांना मध्यरात्री मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. घाटी प्रशासनाच्या वतीने यावर आक्रमक भूमिका घेत व्हिजिटर हवर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खाजगी दवाखान्यात ज्या प्रमाणे पास सिस्टीम घाटीत लागू आहे. तशीच पास सिस्टीम लागू करणार असल्याचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले.

घाटी मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका अनोळखी रुग्णाला रात्री 2 च्या सुमारास भरती करण्यात आले होते. या रुग्णाच्या डोक्याला मार लागलेला होता. त्यावर उपचार सुरू होते. रात्री 3 च्या सुमारास आलेल्या नातेवाईकानी डॉक्टरला मारहाण केली.

2 नातेवाईकांना मिळणार प्रवेश

घाटी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. घाटीत आता खाजगी दवाखान्याप्रमाणेच पास सिस्टीम लागू करण्यात येणार आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर वर्षा रोटे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली आहे. रोटे यांनी सांगितले की, या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे. 6 सुरक्षा रक्षकांना टर्मिनेट करण्यात आलेले आहे. घाटी मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णाचे नातेवाईक दाखल होत असतात. त्यामुळे वॉर्डात देखील गर्दी जमा होते. यावर उपाय म्हणून खाजगी दवाखान्याच्या धर्तीवर घाटी देखील पाच सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. एका रुग्णाच्या केवळ दोन नातेवाईकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

मोफत जेवण बंद

घाटी मध्ये अनेक सामाजिक संघटना मोफत जेवण देतात. जे लोक मोफत जेवण देतात तसे इतर समाजकार्यासाठी दाखल होतात त्यांनाही बंदी घालण्याचा निर्णय घाटी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. ज्यांना मोफत जेवण द्यायचे आहे त्यांनी घाटी प्रशासनाला धान्य दिल्यास घाटी किचनच्या माध्यमातून रुग्णांना जेवण दिले जाईल.

घाटीत अस्वच्छता

मोफत जेवण दिल्यामुळे घाटी परिसरात अस्वच्छता वाढते. तसेच रुग्णाच्या नातेवाईकांऐवजी बाहेरचे लोक येऊन त्याचा फायदा घेतात. त्यामुळे घाटीत कायम गर्दी राहते त्यामुळे अशा लोकांना मज्जाव करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे

जख्मी डॉक्टर.
जख्मी डॉक्टर.
बातम्या आणखी आहेत...