आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायंटिफिक सेमिनार:कोरांनातील योगदानानंतरही दुय्यम वागणुकीबद्दल डॉक्टरांची खंत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील एक तृतीयांश होमिओपॅथी शिक्षण महाराष्ट्रात दिले जाते. कोरोना महामारीत सर्वात आधी आणि शेवटपर्यंत होमिओपॅथी डॉक्टर्स फील्डवर होते. असे असतानाही आम्हाला वैद्यकीय व्यवसायाच्या मूळ प्रवाहात घेतले जात नाही. सन्मानजनक दर्जा मिळत नाही, अशी खंत होमिओपॅथी डॉक्टरांनी शनिवारी आरांग्यमंत्री राजेश टाेपे यांच्यासमोर व्यक्त केली. त्यावर ‘महामारीच्या काळात होपिओपॅथिक डॉक्टरांनी दिलेले योगदान दुर्लक्षित करण्यासारखे अजिबातच नाही. उलट तुमच्या महामारीवर मात शक्यच नव्हती. आगामी काळात सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये तुम्हाला सामावून घेण्याासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करू,’ अशी ग्वाही टाेेपे यांनी यावेळी दिली.

होमिओपॅथीच्या राष्ट्रीय स्तरावरील दोनदिवसीय परिषदेचे उद‌्घाटन शनिवारी (१४ मे) एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झाले. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, परिषदेचे आयोजक डॉ. अरुण भस्मे, आयोजन समितीचे सचिव डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. रामजी सिंग उपस्थित होते.

टोपे म्हणाले, ‘प्रत्येक पॅथीची वेगळी बलस्थाने आहेत. विशेषत: जीवनशैलीशी निगडीत आजारांत होमिओपॅथीचे योगदान लक्षणीय आहे. आयुष मंत्रालयात तुमच्यावर अन्याय झाला आहे. आयुर्वेदिक आणि युनानीच्या तुलनेत तुम्हाला खालचे स्थान देण्यात आले आहे. तुम्हाला विषमतेला सामोरे जावे लागते. या सर्व बाबींची नाेंद मी घेतली आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही आरोग्य विभागातील कायमस्वरूपी नोकऱ्यांत होमिओपॅथी तज्ज्ञांचा समावेश व्हावा याबद्दल मी आग्रही आहे. यासाठी कायद्यात बदल करून तरतूद करावी लागेल. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उत्तम काम सुरू आहे. या योजनेत ४५० रुग्णालयांवरून आम्ही १ हजार रुग्णालयांवर पोहोचलो आहोत. आगामी काळात यामध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक रुग्णालयांचाही त्यात समावेश होणे गरजेचे आहे. यशोगाथा समोर आल्या तर आपण ते नक्कीच करू शकतो, असेही ते म्हणाले.

डॉक्टर म्हणतात, आयुषमध्ये समान दर्जा मिळत नाही
डॉ. बाळासाहेब पवार म्हणाले की, राज्यात ७८ हजार होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत. पण, आयुषमध्ये आम्हाला समान दर्जा नाही. राज्य आणि केंद्राचे असे दोन्ही मंत्री आज व्यासपीठावर आहेत. त्यांनी आम्हाला हा दर्जा मिळवून द्यावा.’
डॉ. अरुण भस्मे म्हणाले की, होमिओपॅथीचे शिक्षण शासनच देते. तरीही शासकीय सेवेत आम्हाला स्थान दिलेले नाही. प्राथमिक आरोग्य सेवेत आम्हाला सामावून घेणे शक्य आहे. महामारीच्या काळात होमिओपॅथी डॉक्टरांनी दिलेल्या सेवेची प्रचिती सर्वांनाच आली आहे.

डॉ. रामजी सिंग म्हणाले, बिहार सरकारने ३ हजार होमिआेपॅथी डॉक्टर सेवेत घेतले. उत्तर प्रदेश, बंगाल बिहारमध्येही स्थान मिळत आहे. मग आपल्याकडे का मिळत नाही?

बातम्या आणखी आहेत...