आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्रात राहावेच लागेल, अन्यथा कारवाई : तुकाराम मुंडे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातच राहावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी काढला. त्यावर डॉक्टरांसाठीची निवासस्थाने राहण्यालायक नसल्याची चर्चा सुरू झाली. सार्वजनिक आरोग्य संचालनालयाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निदर्शनास ही चर्चा आणून दिली असता त्यांनी सांगितले की, आरोग्यसेवा आपत्कालीन आहे. गावात राहण्यासाठीच एचआरए (घरभाडे भत्ता) दिला जातो. त्यामुळे गावात राहावेच लागेल, अन्यथा कारवाई करू, असा इशारा दिला. गरज असल्यास संबंधित विभागाकडून निवासस्थानांची दुरुस्ती करून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

मुंडे औरंगाबादेत येणार अशी चर्चा असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर होती. अखेर शुक्रवारी (४ नोव्हेंबर) त्यांनी जिल्हा रुग्णालय, नेत्र रुग्णालय, कॅन्सर हॉस्पिटल आणि आरोग्य उपसंचालक कार्यालयाची पाहणी करत बैठकाही घेतल्या. या वेळी आरोग्य उपसंचालक डॉ. सुनीता गोलाईत, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. प्रदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

रेफर कमी करा : आरोग्य उपसंचालकांच्या बैठकीत मुंडेंनी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयातून रेफर होणाऱ्या केसेसबाबत नाराजी व्यक्त केली. ज्याचे काम त्याने केलेच पाहिजे, असे त्यांनी ठणकावले. जिल्हा रुग्णालयात वाॅटरकुलर पाण्याअभावी बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुंडे येणार म्हणून सर्व रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवली. जिल्हा रुग्णालयात पार्किंगमध्ये वाहने लावली गेली.

कॅन्सर हॉस्पिटलची केली पाहणी : राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीकरणासाठी नेत्र रुग्णालयाची जागा आवश्यक असल्याबद्दल घाटी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांच्या जागेची मुंडेंनी पाहणी केली.

नेत्र रुग्णालयातील जागेसाठी देणार अहवाल आमखास मैदानावरील नेत्र रुग्णालयाची जागा कॅन्सर हॉस्पिटलच्या विस्तारीकरणासाठी हवी आहे. या जागेची पाहणी मुंडे यांनी केली. त्याचा अहवाल मुख्य सचिवांना देणार असल्याचे ते म्हणाले. त्यांनी केलेल्या पाहणीच्या वेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्यासह नेत्रचिकित्सक डॉ. संतोष काळे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, कॅन्सर हाॅस्पिटलचे डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. महेश वैष्णव आदी उपस्थित होते.

नोंदी व्यवस्थित नसल्याबद्दल जाब
नेत्र रुग्णालयाजवळ पत्र्याच्या शेडमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू होता. मात्र, रुग्णालयाचे चार हॉल रिकामे होते. याबद्दल नाराजी व्यक्त करत मुंडेंनी ओपीडी मुख्य इमारतीत भरवण्याची सूचना केली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला तीन दिवस भरती ठेवणे, नोंदी व्यवस्थित नसल्याबद्दल जाब विचारला. बीडमध्ये जे सांगितले तेच इथेही सांगावे लागतेय, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...