आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदग्रहण सोहळ्यात वानखेडकर यांचे प्रतिपादन:‘जाचक अटींमुळेच डॉक्टर कॉर्पोरेटमध्ये सेवा देतात’

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या जाचक अटी, लालफितीच्या कारभारामुळे डॉक्टर स्वतःचे हॉस्पिटल न उघडता कुठल्याही कॉर्पोरेट हॉस्पिटलला सेवा देत आहेत. छोटे व मध्यम दवाखान्यांची व्यवस्था नष्ट झाल्यास त्याचे दुष्परिणाम समाजावर पडतील. त्यामुळे सर्वसामान्य डॉक्टरांचे प्रश्न वेळीच सोडवणे काळाची गरज आहे, असे मत आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रवी वानखेडकर यांंनी व्यक्त कले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत आयएमएचे अध्यक्ष डॉ.यशवंत गाडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. या वेळी कराड यांनी डॉक्टरांच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले.

इंडियन मेडिकल असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे पार पडला. आयएमए केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष डॉ. जयेश लेले, डॉ. शिवकुमार उत्तुरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, माजी राज्य सचिव डॉ. मंगेश पाटे, अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे यांची या वेळी उपस्थिती होती.

डॉ.भागवत कराड यांनी राइट टू हेल्थ, वैद्यकीय व्यावसायिकांच्या विविध समस्या, मिश्रपॅथी यावर मार्गदर्शन केले. डॉक्टरांना दवाखान्याच्या नूतनीकरणाच्या वेळेस येणाऱ्या विविध अडचणींचा आढावा घेऊन त्याबद्दल ठोस उपाययोजना तसेच डॉक्टरांवरील होणाऱ्या हल्ल्याविरोधात कठोर कायदा करण्याविषयी आश्वासन दिले.

पाच गावे घेणार दत्तक डॉ. यशवंत गाडे यांनी पाच गावे दत्तक घेण्याचा मानस बोलून दाखवला. कामाचे विकेंद्रीकरण करून जास्तीत जास्त सभासदांना विविध कामांमध्ये सामावून घेण्यात येईल, अशी घोषणा केली. या सोहळ्याला २५० आयएमए सभासद उपस्थित होते.