आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा:‘घरातील शिवीगाळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा नव्हे’

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये केलेली शिवीगाळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा होत नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. अहमदनगर जि. प.चे माजी सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर नामदेव डामसे यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात आला. चार भिंतींच्या आता केलेल्या शिवीगाळीवरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट करत दराडे यांची मुक्तता केली. दराडेंच्या वतीने अॅड. मयूर साळुंके यांनी बाजू मांडली. दराडे यांच्या पत्नी सुषमा यांच्यासोबत बोलणे सुरू असताना डामसे मोबाइलवर शूटिंग करत होते. त्यांना असे करण्यापासून रोखताना दराडे यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप होता.

बातम्या आणखी आहेत...