आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती गॅस 524, व्यावसायिक सिलिंडर 1094 रुपयांनी महागले:दोन वर्षांत दोन्ही सिलंडरमध्ये अनुक्रमे 90% आणि 111% दरवाढ

छत्रपती संभाजीनगर / महेश जोशी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाकासाठी आवश्यक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीने दोन वर्षांत आकाश गाठले आहे. गेल्या २४ महिन्यांत सततच्या चढ-उतारानंतर घरगुती गॅस सिलिंडर ९०% तर व्यावसायिक १११% नी महागले आहे. या काळात घरगुती गॅसची किंमत ५२४ रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत १०९४ रुपयांनी वाढली. भविष्यात किमती कमी होण्याची सुतराम शक्यता नाही. या महागाईमुळे घरोघरीचे बजेट मात्र कोलमडले आहे.

१ मार्चपासून १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली. यामुळे फेब्रुवारीपर्यंत मुंबईत प्रति सिलिंडरची किंमत १०५२.५० रुपयांवरून थेट ११०२.५० रुपयांवर पोहोचली. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ३५० रुपयांची वाढ होऊन ती १७२१ रुपयांवरून २०७१.५० रुपयांवर पोहोचली. वरवर पाहता ही वाढ ५०-७० रुपयांची दिसत असली तरी गेल्या दोन वर्षांत हळूहळू घरगुती गॅस ९०% तर व्यावसायिक १११% महागल्याचे दिसत आहे. देशात सरकारी मालकीच्या इंडियन ऑइलचे इंडेन, भारत पेट्रोलियमचे भारत गॅस तर हिंदुस्तान पेट्रोलियमचे एचपी गॅस बाजारात आहेत.

घरगुती : १९ वेळा बदल, १८ वेळा वाढ, एकदा किंमत घटली १ मे २०२० ते १ मार्च २०२३ या २४ महिन्यांत घरगुती गॅसच्या किंमतीत १९ वेळा बदल झाला. पैकी १८ वेळेस किंमती वाढल्या तर केवळ एकदा १० रुपयांनी ती कमी झाली. बदलाची तारीख आणि किंमती अशा- {मे २० - रु.५७९ {जून २०-रु.५९०.५० {जुलै ते नोव्हें २०-रु.५९४ {२ डिसें २०-रु.६४४ {५ डिसें.२० ते जाने. २१-रु.६९४ {४ फेब्रु २१-रु.७१९ {१५ फेब्रु २१-रु.७६९ {२५ फेब्रु २१-रु.७९४ {मार्च २१-रु.८१९ {एप्रिल ते जून २१-८०९ (दर घटले) {जुलै २१-रु.८३४.५० {ऑगस्ट २१-रु.८५९.५० {सप्टेंबर २१-रु.८८४.५० {ऑक्टोबर २१ ते २१ मार्च २२-रु.८९९.५० {२२ मार्च २२-९४९.५० {७ मे २२-रु.९९९.५० {१९ मे २२-रु.१००२.५० {जुलै २२-रु.१०५२.५० {१ मार्च २३-रु.११०२.५० व्यावसायिक : ४२ बदल, २७ वेळा वाढ, १५ वेळा घट १ मे २०२० ते १ मार्च २०२३ या २४ महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ४२ वेळा बदल झाले. यात २७ वेळा दर वाढले तर १५ वेळा घटले. काही महिन्यांत २ ते ३ वेळा दर बदलले. १ मे २०२२ रोजी तर याचे दर २३०७ रुपयांवर पोहचले होते. डिसेंबर २२ मध्ये ते १६९६ रुपयांपर्यंत उतरले. जानेवारी २३ मध्ये त्यात २५ रुपयांची वाढ होवून ते १७२१ रुपये झाले. तर मार्चमध्ये ३५० रुपयांची वाढ होऊन ते २०७१.५० रुपये झाले.

उज्ज्वला वगळता सबसिडी नाही पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत नसल्याने त्यावर राज्याचा व्हॅट लावला जातो. यामुळे याच्या किमतीत राज्यानुसार थोडे बदल होतात. घरगुती गॅस सििलंडरवर पूर्वी सबसिडी असल्याने त्याचे दर आटोक्यात होते. ती काढून घेतल्याने दरात वाढ होत आहे. सध्या फक्त केंद्राच्या उज्वला योजनेअंतर्गत वर्षाला १२ सिलिंडरवर २०० रुपयांची सबसिडी मिळते.

गॅस झाला महाग, कप झाले लहान : एकीकडे गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे चहा-कॉफीच्या ठेल्यांनाही फटका बसला. याचा परिणाम थेट चहा-काॅफीच्या दरांवर झाला नसला तरी कागदी कपांचा आकार मात्र हळूहळू कमी होत गेला. दुसरीकडे, हॉटेलिंगमध्ये २० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...