आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:घरगुती गॅस गळती झाल्याने घरास आग लागुन लाखोंचे नुकसान

बीड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती वापराच्या स्वयंपाकाचा गॅस लिकेज होऊन गळती झाल्याने घरास आग लागुन लाखोंचे नुकसान झाल्याची घटना भोपा येथे गुरूवारी राञी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. या प्रकरणी शासनाने मदत करावी, अशी मागणी आपदग्रस्त कुटुंबाने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तेलगाव पासुन जवळच असलेल्या भोपा ता. धारूर येथील शेख अन्वर शेख बशीर यांच्या पत्नी नित्याप्रमाणे गुरूवारी राञी आपल्या घरात घरगुती वापराच्या गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक गॅस लिकेज होऊन गळती झाल्याने घरास आग लागली. आग लागल्याची ही घटना सौ.शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करत घरातील लोकांना सांगितले. तेव्हा लगेच घरातील लोकांसह इतर नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. माञ तो पर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्यासह इतर सामान जळुन शेख यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शासनाने आर्थिक मदत देऊन, सहकार्य करावे. अशी मागणी आपदग्रस्त शेख कुटुंबाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...