आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा निषेध:वटपौर्णिमेच्या आधी पत्नी पीडितांकडून पिंपळ पूजा; 7 सेकंद देखील ही बायको नको म्हणत मारल्या उलट्या फेऱ्या

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशा बायका देणार असशील, तर कायम मुंजा ठेव असे म्हणत पत्नी पीडित पुरुषांनी सोमवारी पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या घातल्या. महिला वटपौणिमेच्या दिवशी सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा. मात्र, या प्रथेला विरोध करत सात जन्म काय, सात सेकंद देखील ही बायको नको, असे मागणे त्यांनी देवाकडे मागितले.

पुरुषांवरचे अन्याय रोखा

पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाविषयी आतापर्यंत आम्ही शासनाला वारंवार सांगत आहोत. परंतु शासन आणि समाज पुरुषांवर देखील अन्याय होतो, हे स्वीकारायला तयार नाही. शासनाने यांचा स्वीकार करून पुरुषांच्या बाजूने देखील कायदे करावे, पुरुषांनादेखील सन्मान पूर्वक वागणूक मिळावी, पुरुषांच्या संविधानक अधिकारावर गदा येऊ नये, पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा, एकतर्फी कायदे संपवून लिंग भेद न करता कायदे तयार करावे अशा अनेक मागण्या पत्नी पीडित पुरुष संघटनेने केली आहे.

हे मुंजा आमचे ऐक

आम्ही पारायणे केली, परंतु सर्व काही निष्फळ ठरत आहे. अखेर आज वटपौर्णिमेच्या पूर्व संध्येला आम्ही मुंजाला साकडे घातले की, हे मुंजा हे यमराजा उद्या आमच्या बायका येऊन तुला खोटे साकडे घालतील. त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस. अशा बायकांच्या ताब्यात जाण्या पेक्षा तुझाच सहारा चांगला. त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नको. अशा बायका आम्हाला सात जन्म तर काय, पण सात सेकंद देखील नको. असे म्हणून पत्नी पीडित पुरुष आश्रमात एकत्र येत पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली आहे.

कायदा सर्वांना सारखा हवा

भारतीय संविधानात आर्टिकल 14, नुसार कायद्यासमोर समानता असताना समानता राहिली नाही. कायदा स्त्री व पुरुष असा भेदभाव करत आहे. आर्टिकल 21 नुसार पुरुषांना देखील जगण्याचा अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु आज ती गोष्ट पुरुषांकडून ह्या एकतर्फी कायद्याने हिरावून घेतली आहे. बहुतांश पत्नी पीडित हे पत्नीच्या जाचाला कंटाळून व समाजात न्याय न मिळाल्याने हताश होऊन आत्महत्या करताना दिसत आहे. NCRBअहवालावरून ही स्पष्ट होते. त्यामुळे लिंग भेद न करता कायदे बनले गेले पाहिजेत. तसेच पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण द्यायला हवे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...