आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूत्रपिंड दान:सासूचे जावयाला मूत्रपिंड दान ; वेगवेगळ्या रक्तगटांच्या किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तगट न जुळणाऱ्या सासूने जावयाला मूत्रपिंड दान केले. कमलनयन बजाज हॉस्पिटलचे किडनी विकारतज्ज्ञ डॉ. समीर महाजन यांनी वेगवेगळ्या रक्तगटांच्या किडनी प्रत्यारोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली.

दोन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त झालेले ज्ञानेश्वर माजलगावात शेती करतात. किडनी निकामी झाल्याचे निदान झाले. डायलिसिस सुरू झाले. पण, डॉक्टरांनी दोन महिन्यांपूर्वी किडनी प्रत्यारोपणाची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले. ज्ञानेश्वर यांना तीन आपत्ये आहेत. पतीसाठी किडनी देण्यास पत्नी तयार झाली. पण, त्यांच्या ५९ वर्षीय सासूने स्वत:हून किडनी देण्याची तयारी दर्शवली. ६ मुलांची आई असलेल्या प्रेमल गिरी म्हणाल्या, माझा संसार आटोपला आहे. पण, मुलीचा संसार अजून व्हायचा आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर यांच्या आईवडिलांनीही किडनी देण्याचा विचार केला. मात्र, त्यांच्या व्याधींमुळे ते शक्य नव्हते.

ज्येष्ठ किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. अजय ओस्तवाल, डॉ. राजेश सावजी, भूलतज्ज्ञ डॉ. सचिन नाचणे यांच्या सहकार्याने प्रत्यारोपण यशस्वी झाले. या यशाबद्दल मुख्य डॉ. नताशा वर्मा, वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद वैष्णव, विश्वस्त सी. पी. त्रिपाठी यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...