आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:भगवानबाबा बालिकाश्रमात लापशी; कढी-भाताचे अन्नदान

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड बायपास येथील भगवानबाबा बालिकाश्रमात शनिवारी भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त लापशी, कढी-भाताचा नैवेद्य करून दीडशे जणांना अन्नदान करण्यात आले. सकाळी भगवानबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी बालिकाश्रमाच्या संचालिका कविता वाघ, नितीन घुगे, नवनाथ महाराज आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी नवनाथ महाराज म्हणाले की, भगवानबाबा यांनी शिक्षणावर जनजागृती केली. शेती विका पण मुलांना शिकवा. अंधश्रद्धा ठेवू नका, जातिभेद ठेवू नका, शिक्षण हीच मोठी संपत्ती असून ती कुणी घेऊ शकत नाही, असे मार्गदर्शन केले. या वेळी विनायक घुगे, वंदना जगताप, शोभा गांधी, शोभना गोसावी, पुजारी एकनाथ स्वामी गुरुजी यांची उपस्थिती होती.लापशी, कढी-भाताचा प्रसाद : भगवानबाबा यांना गूळ, खोबरे, तूप, तांदूळमिश्रित लापशी आवडत असे. त्यामुळे त्याचा प्रसाद म्हणून दीडशे जणांना करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...