आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार रुपये लिटर:हिंगोलीतल्या गाढवीणींचे दूध 10 हजार रुपये प्रति लिटर विकले जात असल्याची चर्चा, कोरोनापासून बचाव करत असल्याचा दावा; पण यामागील तथ्य काय?

मंगेश शेवाळकर | हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात मागील काही दिवसांत गाढवीनीच्या दुध विक्रीची भल्या पहाटे आरोळी ऐकू येऊ लागली असून अनेक रोगांसाठी हे दूध गुणकारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र गाढवीणीच्या दुधाची विक्री शहरात चांगलाच चर्चेचा विषय बनली आहे. कोरोनाच्या काळापासून लोक आरोग्याच्या दृष्टीने सजग झाले आहेत. त्यातून आयुर्वेदिक काढे, होमिओपॅथी औषधे आणि आयुर्वेदीक गोळ्यांची विक्री वाढली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लोकांकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.

गेल्या आठवडाभरापासून हिंगोली शहरात गाढवीणीच्या दुधाच्या विक्रीची आरोळी पहाटेच ऐकू येऊ लागली आहे. मुखेड भागातून काही जण दूध विक्रीसाठी आले आहेत. गाढवीणीला सोबत घेऊनच हे लोक गल्लो-गल्ली फिरून विक्री करत आहेत. विविध रोगांवर हे दूध गुणकारी असल्याचा आणि कोरोनापासून बचाव करत असल्याचा दावा सुद्धा यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळेच, एक कप ते दोन कप दूध तब्बल 200 ते 300 रुपयांना विकल्या जात आहे.

काय म्हणतो पशुसंवर्धन विभाग?

गाढवीणीच्या दुध विक्रीची बातमी अनेक माध्यमांनी केली आहे. काही राष्ट्रीयस्तरावरील इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही याच्या बातम्या प्रसिध्द केल्या आहेत. त्यात गाढवीनीचे दुध 10 हजार रुपये लिटर प्रमाणे विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक गाढवीण एकावेळी पाव लिटर ते अर्धा लिटर दूध देते. त्यातही दुधाचा तातडीने वापर न केल्यास दूध नासते. मग, 10 हजार रुपये लिटर हा भाव असणे शक्य नाही असेही पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

सर्दी, खोकल्यासाठी उपयोग शक्य -दुग्ध विक्रेते

गेल्या अनेक पिढ्यांपासून गाढविणीच्या दुधाचे फायदे गणले जातात. लहान मुलांना सर्दी, खोकला, धाप लागणे यासाठी हे दूध पाजले जाते. त्यामुळेच या दुधाची विक्री करण्यासाठी आलो आहे. या दुधाला मागणीही आहे असे दूध विक्रेते असे गाढविणीचे दूध विक्रेते दिलीप वलीपोड यांनी सांगितले आहे.

कोरोना अन दुधाचा संबंध नाही -डॉ. गजानन धाडवे

कोरोनामध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या नावाखाली गाढवीनीच्या दुधाची विक्री होत असले तरी त्याचा काहीही संबंध नाही. मात्र लहान मुलांना ब्रॅको न्युमोनिया हा आजार झाल्यास त्याला गाढवीणीचे दूध पाजले तर आजार बरा होतो अशी जूनी समजूत आहे. मात्र त्याला कुठलाही शस्त्रीय आधार नाही असे डॉ. गजानन धाडवे यांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...