आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामचुकार अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका:'आयटक'चा अधिष्ठातांवर आरोप; घाटीत जोरदार निदर्शने

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुशिक्षित असुनही अडाणीपणाच्या पुढचा कारभार घाटी प्रशासनाचा झाला आहे. तसेच किमान वेतनाएवढा पगार कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आला नाही. त्यामुळे 74 कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला, त्यामुळे फरकाची साडेबारा लाख रुपये देण्याची मागणी आयटकच्या वतीने करण्यात आली.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप 'आयटक'चे अभय टाकसाळ यांनी केला आहे.

कामगार उपायुक्त कार्यालयाने आदेश देऊनही घाटी रुग्णालयातील कामगारांसाठीची थकित किमान वेतनाच्या फरकाची तब्बल साडेबारा लाखाची रक्कम अडवुन ठेवली आहे. प्रशासकीय अधिकारी अनुराधा कुलकर्णी यांनी सेवाशर्तीचा भंग केला असल्याने कर्तव्यात कसुर केल्यामुळे त्यांना निलंबित करुन शिस्तभंगाची कारवाई करा या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकतर्फे घाटी रुग्णालयात तीव्र निदर्शने करण्यात आली.

लोकशाही मार्गाने आंदोलन- टाकसाळ

वारंवार लोकशाही पध्दतीने आंदोलन करून कथित कंत्राटी कामगारांच्या शोषणाबाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले.मात्र अनेक प्रश्न चर्चेतून सोडविण्यासारखे असतानाही प्रशासन झुलवत ठेवते.त्यामुळे आज तीन दिवसांत दुसऱ्यांदा कामगारांनी लोकशाही पद्धतीने निदर्शने करीत आंदोलन केले. तसेच सतत दर तीन दिवसांनी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या केल्या मागण्या

तसेच कोविड योद्ध्यांना सेवेत कायम करा, घाटीत प्रत्येक रोगाच्या तज्ज्ञ डाॅक्टरची नेमणुक करा, घाटीची रसद रोखुन खाजगी रुग्नालयांना मदत करणारे सरकार मुर्दाबाद , गोळ्या औषध मोफत मिळालेच पाहीजे, बाहेरच्या चिठ्ठ्या देणे बंद करा , लीपीकवर्गीय पदे त्वरित भरा, एकाकी तांञिक पदांवरील अन्याय दुर करा, अनेक दिवसांपासून भरती नसल्यामुळे त्वरित भरती करून सद्यस्थितील कार्यरत कर्मचारी यांचा वाढलेला वाढलेल्या व्याप कमी करा.

या घोषणांनी घाटी दणाणली

''मला थोडा वेळ द्या'' अशी विनंती डाॅ. कल्याणकरांनी केली होती व दोन दिवसांचा वेळ घेऊनही आज पुन्हा त्यांनी वेळच मागीतला, कायद्यातील तरतुदी दाखवुन देखील प्रशासन आडमुठेपणा मुद्दामहुन करते हे पुन्हा एकदा दिसुन आले.

यावेळी ॲड अभय टाकसाळ, ,राजू हिवराळे , अभिजीत बनसोडे,,दिपक मगर,नंदा हिवराळे,कविता जोगदंड,किशोर शोजुळ ,दिनेश साळवे,अंजुम शेख , , जमीर शेख, ऋतीक जाधव , अतिश दांडगे, शीला मुजमुले, विद्या हिवराळे, गौसीया शेख ,मनीषा हिवराळे, संगीता शिरसाठ माया हिवराळे ,छाया लोखंडे, सोनाबाई हजारे ,बेबी काकडे, याच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...