आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावय झालेले, काहींना व्याधीही जडलेल्या, त्यातच कोरोनाचा कहर... या संकटापासून बचावासाठी लस घेण्यास गर्दी होत आहे. मात्र रिअॅक्शन येईल का, ताप-अंगाला सूज व अन्य त्रास होईल का अशीही भीती अनेकांच्या मनात असते. ही भीती घालवण्याचे काम मनपाच्या एन- ११ आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी करत आहेत. ‘घाबरु नका लस सुरक्षितच आहे, दुसरी लसही अाठवणीने घ्या. लस घेतली तरीही मास्क वापरा, डिस्टन्सिंग पाळा,’असे सांगत प्रत्येक नागरिकांच्या शंकेचे ते अस्वस्थेने निरसन करताना दिसतात.
सुरुवातीच्या काळात लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरल्या, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी पुढाकार घेत नव्हते. पण आता कोरोनाचा कहर खूपच वाढत असल्याने लसीकरणासाठी रांगा लागत आहेत. अर्थात, ज्येष्ठांच्या मनात शंकांचे माेहाेळ असतेच. हे लक्षात घेऊनच एन-११ केंद्रातील डॉ. रवी सावरे प्रत्येकाला लस घेतल्यावर कसे जगावे, काय परिणाम दिसतील, घाबरून न जाता कशी काळजी घ्यावी हे सांगत असतात. डॉ. रवी म्हणाले, ‘लाेकांच्या मनात लसीची भीती जाणवते. म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन संवाद साधतो. त्यामुळे ते मनमाेकळे करतात आणि शंका विचारतात. त्या मी दूर करताे. परिणामी येताना मनात मनात धाकधूक असणारे लाेक लस घेऊन जाताना मात्र समाधानाने जातात.’
लसीबाबत जनजागृतीही : ‘मला ताप येईल का, अंग दुखेल का? गाेळ्या घ्याव्याच लागतील का?’असे प्रश्न ज्येष्ठांचे असतात. त्याचे उत्तर देतानाच ‘आजी-आजोबा तुम्ही लस घेतली, आता २८ दिवसांनी दुसरा डोस लक्षात ठेऊन घ्या. इतरांनाही सांगा. लस घेतली तरी मास्क साेडायचा नाही, ताे नेहमी वापरायचा,’असे डाॅ. रवी सांगतात. मनपाच्या इतर केंद्रांमधील डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारीही अशीच जनजागृती करतात, असे ते म्हणाले.
मनावरील ताण हलका झाला
एन-११ या आरोग्य केंद्रात डॉक्टर आमच्या सगळ्यांशी बोलत होते. अामच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देत होते. एरवी ज्येष्ठांच्या बाेलण्याकडे लक्ष देण्यास काेणाला वेळ नसताे, पण इथे वातावरण वेगळे वाटले. लस घेतल्यावर कसे जगायचे हे तर सांगितलेच, पण यांच्या बोलण्याने आमच्या मनावरचा ताण नक्कीच कमी झाला, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.