आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:पुढील काळात अंबानी, अदानी एक्सप्रेस रेल्वे धावल्यास नवल वाटायला नको; खासदार राजीव यांचा केंद्र सरकारला खोचक टोला

हिंगोली7 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने सर्वच क्षेत्रात खाजगीकरण करण्याचा प्रयत्न चालविला असून रेल्वेचे खाजगीकरण झाल्यास पुढील काळात अंबानी, अदानी एक्सप्रेस रेल्वे धावल्यास नवल वाटायला नको असा खोचक टोला काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार ॲड. राजीव सातव यांनी शुक्रवारी ता. २ हिंगोलीत धरणे आंदोलनात बोलतांना केंद्र सरकारला लगावला आहे.

केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी धोरण मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ॲड. गयबाराव नाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार ॲड. सातव म्हणाले की, अच्छे दिनचा वादा करणाऱ्या मोदी सरकारने अद्यापही अच्छे दिन दाखवलेच नाही. त्यामुळे आता अच्छे दिन नको तर जूने दिवस तरी परत द्या असे म्हणण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नवीन शेतीधोरण आणून शेतकऱ्यांना शेतमजूर होण्याची वेळ केंद्र सरकारकडून आणली जात आहे. या धोरणामुळे देशात कुठेही शेतीमाल विक्री करता येणार असल्याचे सांगून फसविले जात आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतीमाल खागजगी कंपनीलाच विकला पाहिजे हि सरकारची भुमीका आहे. त्यामुळे पुढील काळात खाजगी कंपनीच्या माध्यमातूनलच शेतीमाल खरेदी होणार असून सदर कंपनी अंबानी किंवा आदानी यांचीच असेल असा आरोपही त्यांनी केला. देशातून गोरे इंग्रज गेले व पण केंद्रातील काळे इंग्रज शेतकऱ्यांना मजूर बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकरी व कामगार विरोधी धोरणे मागे घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

चौकटीचा मजकूर

जिओ ला आता जिने दो म्हणण्याची वेळ

देशात जिओचे सिमकार्ड आल्यानंतर मोफत बोलणे व डाटा मिळू लागला होता. त्यामुळे बीएसएनएलचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता जिओ चे सिमकार्ड वापरण्यासाठी पैसे मोजावे लागत असून त्यांचे वाढलेले दर पाहता जिओ ला आता जिने दो म्हणण्याची वेळी आली असल्याचे खासदार ॲड. सातव यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...