आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परीक्षेचा निकाल:निकालाबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका; बोर्डाने अद्याप दहावी-बारावीच्या निकालाची तारीख जाहिर केली नाही

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी-मार्च मधील दहावी बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा अद्याप जाहिर केलेल्या नाहीत. तेंव्हा पालक आणि विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असेज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळवले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया खोळंबली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीचे आणि उत्तरपत्रिका संकलनाचे काम जोरात सुरु आहे. मात्र सध्या सोशल मिडिया आणि व्हाट्सअॅप युनिर्व्हिटीमुळे निकालाबाबत विविध चर्चा सुरु असून, निकालाबाबत अफवा देखील आहेत. यावर राज्यमंडळाने आता पत्राद्वारे कळवले आहे की, बोर्डाने अद्याप निकालाच्या तारखा जाहिर केलेल्या नाहीत त्यावर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख मंडळातर्फे अधिकृत संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रात जाहिर करण्यात येईल. याची शाळा, महाविद्यालयांनी नोंद घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...