आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपयशाकडून यशाकडे...:यशस्वी होण्यासाठी ‘प्लॅन बी’च्या फंदात पडू नका, आपले संशोधन मजबूत असावे

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (७६ वर्षे) हे २०११ पासून कंपनीचे अध्यक्ष इमिरेट्स आहेत. त्यांनी नुकताच तरुणांना नेतृत्वाचा संदेश दिला.

अपयश ः पहिली कंपनी अयशस्वी झाली. १९७६ मध्ये सॉफ्ट्रोनिक्स नावाची कंपनी सुरू केली. अवघ्या दीड वर्षात ही कंपनी बंद करावी लागली. यश ः लवकरच इन्फोसिसची स्थापना केली. नंतर १९८१ मध्ये मित्रांसोबत इन्फोसिस सुरू केली. त्यासाठी सुधा मूर्ती यांच्याकडून दहा हजार रु. कर्ज घेतले. व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीने ‘प्लॅन बी’चा आग्रह धरू नये, असे ते म्हणतात. योग्य रिसर्चनंतवर मनापासून एकच गोष्ट केली तर नक्कीच यश मिळेल. अपयश ः कंपनीच्या संस्थापक किंवा प्रवर्तकांच्या मुलांना इन्फोसिसमध्ये काम करू देण्यास नकार. नारायण मूर्ती म्हणतात की, ही त्यांची मोठी चूक होती. यश ः कामाचे वैविध्यपूर्ण वातावरण तयार झाले. कंपनीचे संस्थापक किंवा प्रवर्तकांच्या मुलांना सामावून न घेण्याचा निर्णय पक्षपातीपणा टाळण्यासाठी होता. पण, नंतर गुणवत्तेच्या आधारावर परवानगी दिली. वैविध्यपूर्ण कामाच्या वातावरणासह इन्फोसिस आज जगातील टॉप-३ आयटी सेवा ब्रँडमधील एक आहे. अपयश ः १९९० मध्ये २ कोटी रु.ना कंपनी विकत घेण्याची ऑफर मिळाली. पहिली ९ वर्षे फारसे यश नव्हते. कंपनी २ कोटी रु. खरेदीची ऑफर आली, मात्र मूर्तींनी नकार दिला. यश ः फोकस वाढवला, कठोर निर्णय घेतले. नारायण मूर्ती सांगतात, मोठ्या यशासाठी छोटीशी सुरुवात करावी लागते. १९९४ मध्ये जनरल मोटर्सला स्वस्त सेवा देण्यास नकार दिला. एकाच क्लायंटवर अवलंबित्व ठेवले नाही. आज इन्फोसिस ही ५.९२ लाख कोटींचे मार्केट कॅप असलेली कंपनी आहे.