आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा वकील संघाने पुकारला संप:धर्मादाय आयुक्त कार्यालयात ऑनलाइन प्रक्रियेची सक्ती नको

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मादाय आयुक्त कार्यालय मुंबई यांच्यामार्फत सर्व धर्मादाय आयुक्त कार्यालयातील कामकाज सक्तीने ऑनलाइन करण्यात आले आहे. हे कार्यालय न्यायिक स्वरूपाचे आहे. येथे कायद्याप्रमाणे प्रकरणे चालतात. कार्यालयातील आस्थापना विभाग व इतर आवश्यक विभाग ऑनलाइन करण्याचे सोडून १ जानेवारीपासून न्यायिक प्रकरणे ऑनलाइन करण्याची सक्ती केली जात असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

२० डिसेंबरपासून धर्मादाय खात्याची वेबसाइट बंद आहे. त्यामुळे आधीच कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. याविरोधात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, सातारा, कोल्हापूर आणि बीडसहित अनेक जिल्ह्यांतील वकील संघांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. तसेच मुंबई वकील संघ यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवणार असून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

कार्यालयातील डेली बोर्ड, नक्कल विभाग, कर्मचाऱ्यांची हजेरी, रेकॉर्ड विभाग, ऑडिट रिपोर्ट विभाग ऑनलाइन करणे गरजेचे असून त्याकडे दुर्लक्ष करत न्यायिक प्रकरणे ऑनलाइन केली जात आहेत. याविरोधात २०१९ मध्ये पुणे वकील संघाने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

याचिकेत कामकाज ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करण्यात यावे, असे स्पष्ट नमूद केले होते. तरीही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत धर्मादाय आयुक्त मुंबई यांनी अवैध परिपत्रक जारी करून वेबसाइट बंद असताना ऑनलाइनची सक्ती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...