आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे आयोजित ‘पद्म महोत्सवा’च्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रामाराव यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम यांच्यासोबत ३० वर्ष काम केलेले डॉ. रामराव यांनी या कार्यक्रमात केलेले मार्गदर्शन त्यांच्याच शब्दांत.
नमस्कार…. हा विलक्षण वेगळा कार्यक्रम आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर सर्वोत्तम दिलेल्या ११ जणांना तुम्ही बोलावले आहे. ही प्रेरणादायी मेजवानी आहे. तुमच्याशी संवाद साधताना मला काही गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या मी दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून शिकलो. आपली नैतिक मूल्ये कधीही विसरू नका, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवा, दररोज नव्या गोष्टी शिकण्यासाठी जागरूक राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे असामान्य गोष्टी मिळवायच्या असतील तर असामान्य काम करा. कलामांनी सांगितलेल्या या गोष्टींचे मी आणि सहकाऱ्यांनी तंतोतंत पालन केले. ‘असामान्य काही मिळवायचे असेल तर तुम्हाला असामान्य काम करावेच लागेल. डॉ. कलामांसोबत अग्नी, आकाश, नाग, त्रिशूल, पृथ्वी या मिसाइलवर मी काम केले. त्यामुळे संशोधनासोबत अनेक संस्कार माझ्यावर होत गेले. दररोज नवे काही शिकण्याचा त्यांचा ध्यास आमच्यातही आला. आजचा दिवस शेवटचा दिवस आहे, असे समजून जगा हा कानमंत्र त्यांनी दिला आहे. तुमच्या प्रत्येकात असामान्य क्षमता आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा.
सध्या जग वेगळ्या पद्धतीने विचार करते आहे. कोळसा आणि तेलावर दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे कुणालाही नको आहे. अवलंबून राहणे थांबवण्यासाठी प्रचंड संशोधने सुुुरू आहेत. अमेरिका, फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कामात भारताचाही सहभाग आहे. समुद्रातील पाण्यापासून हायड्रोजन तयार करून त्यातून ऊर्जानिर्मिती हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
प्रत्येकाची गरज वेगळी कोणत्याही एका देशाचे मिसाइल सर्वोत्तम आहे, असे म्हणता येत नाही. कारण, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. अमेरिकेचे मिसाइल भारताला उपयोगाचे नाही. आपले त्यांना उपयोगी ठरत नाही. आपले मिसाइल आपल्या गरजा भागवण्यासाठी आहेत. आपण फक्त मिसाइल बनवले नाही तर मोठ्या प्रमाणात उत्पादन करून निर्यातही केले. इतर देशांनाही त्याचा फायदा करून दिला आहे, याचे समाधान वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.