आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका...

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण परमात्म्याचे अंश आहोत. म्हणून आपल्या भौतिक ओळखीपेक्षा मोठे आहोत. आपण एका अनंत पॉवरहाऊसचा भाग आहोत, जे संपूर्ण विश्वावर नियंत्रण ठेवते. म्हणूनच आपल्याकडे विकासाच्या अनंत शक्यताही आहेत. सुफी संत जलालुद्दीन रुमी यांचे सुंदर शब्द आहेत... ‘तुम्ही पंख घेऊन जन्माला आलात, मग आयुष्यात रेंगाळता का?’

आ पल्या सर्वांना नेहमी उत्साही, प्रेरणेने परिपूर्ण, निर्भयी राहण्याचा, जीवनात प्रगती करावी वाटते. आपल्यापैकी बरेच जण शारीरिक शक्ती, बौद्धिक क्षमता, आर्थिक सामर्थ्य, सामाजिक संबंध, सुरक्षिततेसाठी आपल्या विमा पॉलिसी इत्यादींवर आपला विश्वास ठेवतात आणि व्यक्त करतात. आत्मविश्वास हा बऱ्याच प्रेरक वक्ते आणि प्रशिक्षकांचा आवडता विषय असतो. त्यांच्या व्याख्यानांमध्ये एक सामान्य म्हण असते.’जोपर्यंत आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत जगासमोर ढोंग करा’. आत्मविश्‍वासाची खरी गुणवत्ता आत्मसात करण्याऐवजी आत्मविश्‍वासाची वरवरची प्रतिमा मांडणे हा आहे. अढळ आत्मविश्वास आणि निर्भयतेसाठी सनातन शास्त्रांकडून प्रेरणा घ्या. रामायणात, श्रीरामाच्या वानर सैन्यातील योद्धा अंगदाने रावणाशी युद्ध करण्यापूर्वी अकल्पनीय कामगिरी केली. अंगद एक शूर आणि धाडसी योद्धा होता. रामाचा दूत म्हणून रावणाच्या दरबारात पाठवण्यासाठी अंगदची निवड झाली. माता सीतेवर केलेल्या अक्षम्य अपराधाबद्दल माफी मागण्याची ही रावणाकडे शेवटची संधी होती. अंगदने निर्भयपणे शत्रूच्या प्रदेशात प्रवेश केला. देवाचा आशीर्वाद सुरक्षा करेल, अाण रावणासारखा बलाढ्य राक्षस, काही करू शकणार नाही, असा अंगदचा ठाम विश्वास होता. रावणाने जेव्हा शांतीचा संदेश स्वीकारला नाही तेव्हा अंगदने रागाने आपली मुठ्ठी जमिनीवर ताकदीने मारली. त्यानंतर जमीन हादरली आणि रावणाचे काही मुकुट उडुन समुद्राच्या पलीकडे श्रीरामाच्या पायात जाऊन पडले. पुढे, अंगदने आपला पाय जमिनीवर घट्ट रोवला आणि रावणाच्या दरबारात सर्वांना आव्हान दिले की, कोणीही पाय उचलून दाखवला तर तो युद्धातील विजय मानला जाईल. रावणाच्या दरबारातील कोणीच अंगदचा पाय हलवू शकला नाही. आपले काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, तो आकाशमार्गाने परत आला.

एक प्रसिद्ध म्हण अशी की, विश्वास डोंगरालाही हलवू शकतो. अंगदच्या निर्भयपणाचा आणि अतुलनीय आत्मविश्वासाचा उगम म्हणजे त्याची प्रभू रामावर गाढ श्रद्धा होती. आपल्या निःस्वार्थ भक्तांच्या हृदयात निवास करणारे भगवान त्यांना आतून मजबूत करत असतात, जीवनात आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास भरतात.एक अगदी लहान ठिणगी संपूर्ण जंगल भस्मसात करू शकते. त्याचप्रमाणे, आपण सामान्य जीव आहोत, जे भगवंतापुढे अत्यंत छोटे आहेत; परंतु आपण आत्म्याच्या वैभवात चमकण्यासाठी दैवी गुण आत्मसात करतो. म्हणून आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आपली खरी ओळख परमात्म्याचा एक छोटासा भाग म्हणून करायला हवी.

बातम्या आणखी आहेत...