आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वेण्या, नीटनेटका गणवेश आणि पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी शाळेच्या वर्गात बसलेल्या विद्यार्थिनी शिक्षणाधिकारी वर्गात येताच त्यांच्याकडे खो-खो, कबड्डी खेळायची इच्छा व्यक्त केली अन् चक्क शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी विद्यार्थिनींची ही इच्छा पूर्ण करत त्यांना प्रोत्साहन दिले. शाळेच्या मैदानात खुर्चीवर बसून त्यांनी खेळाचा आनंदही घेतला. हा आगळा उपक्रम तिसगाव जिल्हा परिषद शाळेत पाहण्यास मिळाला.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. शाळाही बंद होत्या. ऑनलाइन वर्ग सुरू होते पण विद्यार्थ्यांना त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शिवाय या दोन वर्षांत बालविवाहाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात समोर आले. मागील वर्षी शिक्षण विभागातर्फे शाळा भेटीदरम्यानच मंगळसूत्र घालून वर्गात आलेल्या विद्यार्थिनीही आढळून आल्या होत्या. यंदा १५ जून रोजी शाळा सुरू झाल्यावर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे शाळा भेटी दरम्यान केलेल्या पाहणीत मुलांच्या तुलनेत ७५ टक्के विद्यार्थिनींची उपस्थिती दिसून आली. शिकण्याचा उत्साह आणि काही करून दाखविण्याचे तेज मुलींच्या चेहऱ्यावर दिसून आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
एकमेकांना परीक्षेच्या तयारीसाठी करतात मदत
विद्यार्थिनीदेखील गुणवत्तेत कुठेच मागे नाहीत. सर्व कामे करून त्या शिक्षणातही प्रामाणिक आहेत. प्रत्येक सोपवलेले काम त्या करतात. त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. बोडखा गावातील कैलास विद्यालयात भेटीदरम्यान विद्यार्थिनी स्वत:च एकमेकांना एनएमएमएस परीक्षेच्या तयारीसाठी मदत करत असल्याचेही दिसून आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.