आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्स्पायरिंग:लोकांचे विचार बदलण्याची, त्यांना सोबत घेण्याची संधी, व्यर्थ दवडू नका

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण नेहमीच आरोग्यावर बोलत असतो. आज पृथ्वीच्या आरोग्यावर जरा बोलू. हवामानात होत असलेला बदल हा मानवी मुद्दा आहे, राजकीय नव्हे. त्याबाबत आपण अतिशय उदास आहोत. त्याच्या परिणामाबाबत कृतीही फारच उशिरा करतो. आज आपण अशा काळात आहोत त्यात आपल्याकडे विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे. पृथ्वीला वाचवण्याची आपल्याकडे क्षमता आहे. मला माहित आहे, समस्या आली की तुम्ही कृती करालच. या जगाला वाचवण्यासाठी आपण छोट्या-छोट्या स्तरावर प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांना सहकार्य करावे. प्रत्येक जंगल, प्रत्येक नदी, प्रत्येक समुद्र, प्रत्येक किनारा, प्रत्येक पशू, प्रत्येक कीटक... झाडाचे प्रत्येक पान, सुर्याचा प्रत्येक किरण, पावसाचा प्रत्येक थेंब आपल्यासाठी खास आहे. आपण जीवंत राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट एकमेकाशी निगडीत आहे.

ज्या जगात आपण राहात आहोत, त्याकडे पाहिल्यास हे अतिशय आव्हानात्मक असल्याचे अनुभवास येईल. मात्र आपले काम त्याला अधिक प्रकाशमान आणि चमकदार बनवणे आहे. दरदिवशी आपण जाहिरातींचे हल्ले सहन करत असतो. माध्यमांच्या गोष्टी ऐकतो. सत्याची मुस्कटदाबी होताना पाहतो. सकारात्मक विचारांची तडजोड होताना पाहतो. मात्र विचलित होत नाही. कारण आपण आवाज उठवू शकतो, हे आपल्याला माहित आहे.

मागील पिढीला कोणत्याही गोष्टीचा फारसा फरक पडत नसे, हे गोष्ट कदाचित तुम्हाला हैराण करू शकते. मात्र हा निर्णय बदलण्याचा नक्की प्रयत्न करा. जगाकडे तुम्ही जसे पाहता, तसे इतर कुणीच पाहू शकत नाही, हे नेहमी लक्षात असू द्या. मात्र त्यांना त्याची फिकीर नाही, असा त्याचा अर्थ नाही. काहीतरी वेगळा विचार करणाऱ्यांची, मानसिकता बदलण्याची ही संधी आहे. त्यांना सोबत घेण्याची संधी आहे. एखादा उपाय शोधण्याच्या दिशेने जाण्यासाठी... तुम्ही त्यांना विरुद्ध दिशेने काम करण्यासाठी सोडू शकत नाही. जे लोक एखाद्याच्या बाजूने उभे नाहीत, त्यांना सोबत घेण्याची हीच योग्य वेळ आहे. (प्रिन्स हॅरी यांचे २०१९ मधील एक भाषण.)

आजपासून या यादीवर काम करणे सुरू

धोका पत्करा प्लास्टिक हटवा प्रामाणिक राहा पाणी वाचवा धाडसी बना दुसऱ्यांप्रति दयाळू राहा स्वत:प्रति उदार असावे अपेक्षेला खरे उतरा संवेदना जिवंत ठेवा वन्य-जीवनाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी. स्क्रीनवर कमी वेळ घालवा, लोकांना भेटा. आपल्या मित्रांना विचारा, ते कसे काम करतात? त्यांच्याकडून उत्तरे ऐका. विचार बदला आणि जगाला बदला. जगातील सर्वात चांगली पिढी बनवण्याचे धाडस ठेवा. मी तुमच्यासोबत आहे. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आता कामाला लागा.

बातम्या आणखी आहेत...