आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली असली तरी, ‘औरंगाबादकरांनो, काळजी करू नका,’ असा सल्ला मनपाच्या आरोग्य विभागाने दिला आहे. शहरात सध्या कोरोनाचा एकही अॅक्टिव्ह रुग्ण नाही. मात्र केंद्र सरकारने दिलेल्या दक्षतेच्या सूचनांची अंमलबजावणी सुरू झाली करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. बुधवारी (२१ डिसेंबर) या संदर्भात बैठकही घेण्यात आली.
शहरातील बहुतांश नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पहिल्या डोसचे ८६ टक्के तर दुसऱ्या डोसचे ६८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. १५ ते १७ वयोगटातील ६६ टक्के जणांना पहिला तर ५१ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १२ ते १४ वयोगटातील ७१ टक्के जणांना पहिला तर ४८ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सर्व वयोगट मिळून ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा मनपाकडून करण्यात आला आहे.
४६० ऑक्सिजन बेड, १०४ व्हेंटिलेटर तयार ४६० ऑक्सिजन बेड, १०४ व्हेंटिलेटर तयार आहेत. आपल्याकडे जेनेम सिक्वेन्सिंगसह सर्व टेस्ट होतात. व्हीआरएल लॅब सज्ज आहे. एक हजार आरटीपीसीआर रोज होऊ शकतात अशी यंत्रणा सज्ज आहे. - डॉ. संजय राठोड,
अधिष्ठाता घाटी सर्वांनी नियम पाळावेत कोरोनाचे लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले आहे. कोरोनाबाबत केंद्र सरकारच्या सूचना येताच तत्काळ बैठकही घेण्यात आली. नागरिकांनी नियम पाळावेत. - डॉ. पारस मंडलेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.