आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी:फिट आलेल्या मुलाला कुणाच्या गाडीवर नेऊ, तुमच्यात माणुसकी नाही का

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षा संपाचा सर्वाधिक फटका बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना बसला. बीडहून आलेल्या एका महिलेच्या चार वर्षीय मुलास फिट येत हाेते. त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षा मिळत नव्हती. अनेकदा विनवण्या केल्यानंतर एक रिक्षाचालक तयार झाला अन् ती महिला मुलाला घेऊन रुग्णालयात गेली.

सिडकाे बसस्थानकाबाहेर गुरुवारी सकाळपासून तुरळक रिक्षा उभ्या हाेत्या. ते प्रवाशांना साेडण्यास तयार नव्हते. दुपारी १२.३० वाजता बीडहून दाेन महिला आल्या. त्यांच्यासाेबत चार वर्षांचे मूल हाेते. ते आजारी असल्याने त्याला रुग्णालयात दाखवायचे हाेते. साेबत मुलाची आजी कैसरबी शेख हाेती. अचानक त्या मुलाला फिट आली. त्यामुळे आई व आजीने धावत एक रिक्षा गाठली. त्याला तातडीने दवाखान्यात जायचे असल्याचे सांगितले. मात्र ‘संप सुरू आहे, तुम्ही एखाद्या दुचाकीने जा,’ असा अजब सल्ला रिक्षाचालकाने दिला. तेव्हा संतापलेल्या आजीने मुलाला गाडीवर कसे नेऊॽ माझ्या काेणी आेळखीचेही नाही, तुमच्यात माणुसकी शिल्लक आहे काॽ असे सुनावले. तेव्हा काही पत्रकार व छायाचित्रकारांनी एका रिक्षाचालकाला त्या महिलेस नेण्याची विनंती केली तेव्हा ताे राजी झाला अन‌् मुलाला दवाखान्यात नेणे शक्य झाले.

बातम्या आणखी आहेत...